Udayanraje on Sharad Pawar : '...म्हणून शरद पवार हेच माझ्या निवडणुकीचे मुख्य प्रचारक'; उदयनराजेंचं प्रत्युत्तर!

Satara Lok Sabha Constituency : शरद पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटणमध्ये आयोजित जाहीर सभेतून उदयनराजेंवर निशाणा साधला होता.
Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Sharad Pawar, Udayanraje Bhosalesarkarnama

Loksabha Election 2024 : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, तर निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून, अन्य टप्प्यांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. यामध्ये नेते मंडळी विरोधी पक्षातील उमेदवारांवर निशाणा साधत आहेत. अशाचप्रकारे महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर शरद पवारांनी त्यांची कॉलर उडवून निशाणा साधला होता. ज्यास आता उदयनराजेंकडून प्रत्युत्तर दिले गेले आहे.

वाई येथील सभेत शरद पवार यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. यामध्ये त्यांनी उदयनराजेंना काय बोलायचं, कॉलर उडवली की झालं. कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे बघावं लागतं, अशी टीका शरद पवारांनी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Sharad Pawar Satara : उदयनराजेंना खुन्नस; शरद पवारांनी दुसऱ्यांदा उडवली कॉलर

या टीकेला उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, 'मी नेहमीच कॉलर उडवतो. पण, मी लोकांच्या हिताच्या विरोधात काहीही केलेले नाही. मी सकाळी, दुपारी, पहाटे ब्रह्म मुहूर्तावर, नाईट सूटमध्ये आणि रात्री झोपेतसुद्धा कॉलर उडवतो. शरद पवारांनी हे संकेत दिले आहेत की, आम्ही दिलेला उमेदवार हा चुकीचा आहे आणि उदयनराजे हे योग्य उमेदवार आहेत, त्यांना मतदान करा.'

'त्यामुळे माझ्या निवडणुकीचे मुख्य प्रचारक म्हणून एवढ्या सभा शरद पवार या मतदारसंघात घेत आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त मतांनी उदयनराजे निवडून आले पाहिजेत,' असेही ते म्हणाले.

Sharad Pawar, Udayanraje Bhosale
Aniketraje Naik Nimbalkar : 'इतकी त्याच्यात क्षमता असेल तर..' ; अनिकेतराजेंचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना टोला!

शरद पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटणमध्ये आयोजित जाहीर सभेत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली. या वेळी भाषण संपल्यानंतर त्यांना उपस्थित नागरिकांपैकी काहींनी पवारांना कॉलर उडवण्याचा आग्रह केला. त्यानंतर मग त्यांनी उदयनराजेंच्या  Udayanraje Bhosale स्टाइलनुसार कॉलर उडवली. ज्यावर कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळाला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com