

आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत..थोडया दिवसात ते भाजपात येतील, असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केले आहे.भाजपाने त्यांना घ्यायचं का नाही, ते बघावे, कारण सत्ते विना ते बाळ जगू शकत नाही..कधी उडी मारायचे, ते बघायला लागले आहे.. असा टोला देखील जयंत पाटलांचं नाव न घेता सदाभाऊ खोतांनी लगावला आहे.. सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
हिंगोली मध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला दोन ते तीन जणांनी मारहाण केली आहे वसमत तालुक्यातील शिरडशहापूर परिसरातील वैजनाथ पेट्रोल पंपावर हा सगळा मारहाणीचा गंभीर प्रकार घडला आहे, मारहाणीची ही घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, सचिन कांबळे असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिसात मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण व्हावे अशी अजितदादांची इच्छा असल्याचं देखील समाज माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहे यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी अजितदादांची 2004 साली मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असताना देखील ती पूर्ण केली गेली नाही त्यात काही जणांनी उलट सुलट चर्चा केल्या तीच लोक आता अजित दादाची इच्छा असल्याचे सांगत असल्याचं आमदार जगताप यांनी म्हटलं आहे
राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाकडून विलीनीकरणाला विरोध होताना पाहायला मिळतोय अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी विरोध दर्शवला आहे. अजितदादांच्या दुर्दैवी निधनाला काही तास झाले नाही तोच शरद पवार गटाकडून विलीनीकरणाच्या चर्चा करणे दुर्दैवी असल्याचं जगताप यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेतील महापौरांची निवड लवकरच होणार आहे. त्यासाठी आता महायुती दोन गटाची नोंदणी करणार आहे. भाजपचा एक गट असेल तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचा मिळून दुसरा गट असणार आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ आता १२१ नगरसेवक इतके होणार आहे. कोकण विभागीय कार्यालयात उद्या भाजप, शिवसेनेचे नगरसेवक जाणार आहेत. त्याठिकाणी नोंदणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी भाजप नेते पियुष गोयल यांच्यावरही टीका केली. गोयल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नसून भाजपचे नेते आहेत. दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसल्याने त्यांचे नाक जळालं आहे, असा हल्लाबोल मिटकरींनी केला आहे.
'लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार,' असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. एकनाथ शिंदे हे कोल्हापुरातील कागलमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.
'तरुणांच्या हाताला काम व त्यांच्या स्वप्नांचा सन्मान करणारा हा अर्थसंकल्प असून यातून शिक्षणापासून ते रोजगारापर्यंतच्या पायाभूत सुविधांना बळ मिळून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणारा आहे,' असा विश्वास राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
'आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला वाटा जास्त आहे. महाराष्ट्रातल्या खासदारांनी दिल्लीत भांडले पाहिजे. बजेटचा आकडा फुगत असला तरी, शेतकऱ्यांसाठी मात्र बजेट लहान होत आहे. बजेटमध्ये फक्त योजना दिल्या रोजगाराची भाषा कोणी बोलत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कुठलाही प्रभाव केंद्रावर दिसत नाही,' असा घणाघात बच्चू कडू यांनी केला.
केंद्र सरकारकडून मांडण्यात आलेल्या बजेटमध्ये शेतकरी, महाराष्ट्र तसेच देशातील उद्योग आणि उद्योजकांना काहीच मिळाले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार माजी अर्थमंत्री जयंत पाटील केली. मंदिरांसाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र कोणती मंदिरात ही सांगितली नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनात आणि ज्या देवांच्यावर भक्ती आहेत, त्याचाच विकास होणार का? इतरांचे देव मागे राहतील का? असा सवाल देखील जयंत पाटलांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर केला. तसेच नेहमीप्रमाणे देशातील उद्योग आणि उद्योजकांना भरीव बुस्ट मिळेल, असं काही दिसत नाही, अशी टीका देखील जयंत पाटलांनी बजेटवर केली.
प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असा दावा भाजपचे पियुष गोयल यांनी केला. यावरून राज्यात राजकीय गदारोळ सुरू असून, आता माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "वहिनीसाहेबांसोबत अजितदादांशी चर्चा झालीच असेल. वाहिनीसाहेब जो निर्णय घेतील, तो मान्य असेल. फक्त सुनेत्राताई पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. बाकी कोणी होणार नाही. सह्या करो किंवा न करो, आमची चर्चा झाली आहे. उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असतील," असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर म्हटले की, “आम्हाला खूप कमी तपशील मिळाले. तीन-चार मथळे आले होते, पण आम्ही अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेची वाट पाहत होतो. ते कुठे आहे? आम्हाला ते केरळमध्ये हवे होते. आमच्याकडे आयुर्वेदाची खूप जुनी परंपरा आहे. हे थोडे आश्चर्यकारक आहे. कदाचित अर्थसंकल्पीय दस्तऐवजात अधिक तपशील असतील. मी ते अजून वाचलेले नाही. भाषणात खूप कमी तपशील होते.”
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर तात्काळ भाष्य करण्यास नकार दिला. यावर सोमवारी संसदेत विचार मांडेल. पण, काँग्रेस पक्षाने अर्थसंकल्पावर टीका करत तो निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस खासदार जयराम रमेश म्हणाले, "कागदपत्रांचा सखोल अभ्यास न करताही, पहिल्या 90 मिनिटांत हे स्पष्ट झाले की अर्थसंकल्प त्याच्याभोवती बांधलेल्या अपेक्षा पूर्ण करत नाही."
सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष असतील.वहिनी सोडून दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. आमच्या सर्व पक्षाच्या लोकांचा निर्णय झालेला आहे की उत्तराधिकारी सुनेत्रावहिनी असतील. त्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील. उपमुख्यमंत्री, गटनेत्या त्याच असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा त्याच असतील, असे वक्तव्य आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.
परिवहन मंत्रालय
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत 2026-27 चा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. परिवहन मंत्रालयाला सर्वात जास्त बजेट मध्ये वाटा मिळाला आहे. सरकारने परिवहनसाठी 5,98,520 कोटी रुपये वाटप केले आहेत.
संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालय दुसऱ्या नंबरवर आहे, या मंत्रालयाला 5,94,585 कोटी रुपये मिळाले आहेत.
ग्रामीण विकास मंत्रालय
ग्रामीण विकास मंत्रालय 2,73,108 कोटी रुपयांसह तिसऱ्या नंबरवर आहे,
गृह मंत्रालय
गृह मंत्रालय 2,55,234 कोटी रुपयांसह चौथ्या नंबरवर आहे,
कृषी मंत्रालय
कृषी मंत्रालय 1,62,671 कोटी रुपयांसह पाचव्या क्रमांकावर आहे
शिक्षण मंत्रालय
शिक्षण मंत्रालय 1,39,289 कोटी रुपयांसह सहाव्या नंबरवर आहे,
ऊर्जा मंत्रालय
ऊर्जा मंत्रालय 1,09,029 कोटी रुपयांसह सातव्या नंबरवर आहे,
आरोग्य मंत्रालय
आरोग्य मंत्रालय 1,04,599 कोटी रुपयांसह आठव्या नंबरवर आहे,
नगरविकास मंत्रालय
नगरविकास मंत्रालय 85,522 कोटीसह नवव्या नंबरवर आहे.
आयटी , दूरसंचार मंत्रालय
आयटी आणि दूरसंचार मंत्रालय 74,560 कोटी रुपयांवर आहे.
Union Budget News : आज (ता.01) सादर झालेल्या 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "हा अर्थसंकल्प म्हणजे, खुप साऱ्या अफाट संधींचा महामार्ग आहे... हा अर्थसंकल्प 2047 मध्ये विकसित भारताच्या आपल्या उदंड स्वप्नाचा पाया आहे."
देशात पाच ठिकाणी आरोग्य हब तयार करणार असल्याची माहिती निर्मला सितारामन यांनी दिली आहे. तसेच वयोवृद्धांची काळजी घेणारी आरोग्ययंत्रणा उभारणार आहे. वयोवृद्धांची काळजी घेण्यासाठी दीड लाख लोकांना तयार करणार असं देखील त्यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. शेअर बाजार 2,300 पेक्षा जास्त ने कोसळला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाल्याचे काही अंशी दिसत आहे.
कर्करोग, मधुमेह ची औषधे आणि इतर सात आजारांवरील औषधे स्वस्त होणार.
शूज, बॅटरी आणि मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त होणार.
सौरऊर्जेशी पुरक संबंधित उत्पादने स्वस्त होणार आहेत.
संरक्षण क्षेत्रात मूलभूत सीमाशुल्क माफ होतील.
चामडे आणि कापड निर्यात करणे स्वस्त होतील.
पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयांसाठी अनुदान योजना
15 पुरातत्वीय स्थळे जीवंत स्थळे म्हणून विकसित केली जातील
ईशान्येकडील 5 राज्यांमध्ये पर्यटन स्थळांचा विकास
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी स्थापन केली जाईल
औद्योगिक कॉरिडॉरमध्ये पाच विद्यापीठ टाउनशिप
प्रत्येक जिल्ह्यात मुलींचे वसतिगृह
ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी योजना
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची योजना
खेलो इंडिया मिशन
टीसीएस परदेशी टूर पॅकेजेसमध्ये 2 टक्क्यांनी वाढ करणार
डिजिटल नॉलेज ग्रिडवरील पर्यटन स्थळांची माहिती
चंदन लागवडीला प्रोत्साहन, नारळ संशोधन केंद्र स्थापन करण्याची महत्वकांक्षी घोषणा
नारळ संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा यामध्ये 3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार अशी माहीती.
पशूपालन दुग्धव्यवसायासाठीचे अनुदान वाढवणार
काजू, कोको ब्रँड जागतिक दर्जा मिळवून देणार
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
500 एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार
दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन अधिक मजबूत करणार
चंदन, नारळ आणि काजू या पिकांना चालना देणार
ईशान्य भारतात बदाम आणि शेंगदाण्याचे उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर
चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यात येईल.
आयातीवर अवलंबत्व कमी करणार
मत्स्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार
नारळ उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक असून सुमारे 3 कोटी लोकांचे उपजीविका या क्षेत्रावर अवलंबून आहे.
नारळ क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रस्ताव मांडण्यात येत असून, सरकारकडून आवश्यक मदत दिली जाईल.
1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन यांची घोषणा
१ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. काय होणार फायदा... आयटीआर फाइल करणे सोपे सहज होणार.
अपघात विमा करमुक्त करणार
सेमी कंडक्टरसाठी 40 हजार कोटी
शुगर आणि कॅन्सरचे औषधोपचार स्वस्त
मुंबई- पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर
20 नवे जलमार्ग बनवणार
बॅकिंग क्षेत्राच्या विकासासाठी नवी समिती
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले की, मंदिरांसाठी 5000 कोटी रुपयांची तरतूद केली आली आहे. टियर 2 आणि 3 मधील शहरांना याचा फायदा होणार आहे.
2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यांसाठी 1.4 लाख कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहीती सीतारमन यांनी दिली आहे. यानुसार राज्यांना आर्थिक स्वरुपाचे नियोजन करावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आता प्रफुल्ल पटेल आहेत, असं विधान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी केले आहे. PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही विधान केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरण होईल असं वाटत नसल्याचे देखील गोयल यांनी म्हंटले आहे. त्यांच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, गोयल यांना नियुक्तीची माहीती कुठून मिळाली याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा झाली आहे. यामध्ये मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. 7 नवीन हायस्पीड सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.हे. पुणे -हैदराबाद कॉरिडोरचाही यामध्ये समावेश असणार आहे.
Health Sector Union Budget News Update : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली की, देशातील बायोफार्मास्युटिकल क्षेत्राच्या विकासामुळे कर्करोग आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवरील औषधं स्वस्त होणार. तसेच सीतारमन यांनी 10,000 कोटी रुपयांचा एसएमई ग्रोथ फंडही जाहीर केला. भविष्यातील नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि निवडक निकषांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार 10,000 कोटी रुपयांचा समर्पित एसएमई ग्रोथ फंड सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत असल्याचं त्यांनी जाहीर केले.
येणाऱ्या 5 वर्षात नवीन जलमार्ग सुरु करणार अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. 20 नवे जलमार्ग सुरु करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाराणसी, पाटण्यात जहाजबांधणी केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत योजनेसाठी 2 हजार कोटींचं टॉपअप दिले जाणार असल्याची माहीती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.
Nirmala Sitharaman Budget LIVE Update : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संत रविदासांचे नाव घेत आपल्या भाषणाला प्रारंभ केला. अर्थमंत्र्यांनी देशांतर्गत उत्पादन, ऊर्जा सुरक्षा, दारिद्र्य निर्मूलनापासून ते रोजगारापर्यंतच्या मुद्द्यांवर भर दिला.
केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्या नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. देशाच्या नजरा या अर्थसंकल्पावर लागल्या आहेत. अर्थमंत्री त्यांच्या पोतडीतून सर्वसामांन्यांसाठी काय काढतात सर्वांसाठी उत्सुकतेचे आहे.
Union Budget 2026 Liive Update : पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार का? कमी होणार? अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा
अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींबाबतही निर्णय होऊ शकतो. पेट्रोल डिझेलच्या दरावर सध्या जीएसटी आकारला जात नाहीये. जीएसटी आकारण्याची मागणी केली जात होती. जर समान जीएसटी दर आकारला तर पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील. दरम्यान, याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज (ता.01) सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामुळे संरक्षण क्षेत्रात मोठी संधी निर्माण होऊ शकते. या गोष्टीचा अंदाज घेऊन, आज सकाळी संरक्षण शेअर्समध्ये निर्णायक वाढ झाली. सकाळी 10:15 वाजेपर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढले होते. पारस डिफेन्सचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढले. सुरुवातीच्या व्यवहारात डेटा पॅटर्नचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक वाढले.
Union Budget LIVE: अर्थसंकल्प सादर होणार आहे. शेअर बाजारातील अपडेट्स येत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादर होण्याच्या दिवशी, सेन्सेक्स 82,328.15 अंकांवर आहे, तर निफ्टी 25,314.60 वर आहे. दरम्यान, सरकारी सूत्रांनुसार, जानेवारी 2026 मध्ये जीएसटी संकलन 1,93,384 कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा हे 6.2% वाढ पहायला मिळत आहे.
अर्थसंकल्पात टॅक्ससंदर्भात अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये जुनी कर प्रणाली रद्द केली जाऊ शकते. परंतू याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.
आज (ता.01) संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासाठी केंद्रिय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान पोहोचले आहेत. त्यांची पहीली प्रतिक्रिया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळ अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देतील, आणि तो नंतर सभागृहात मांडला जाईल. याअगोदर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थसंकल्पाबद्दल अभिनंदन करण्यासाठी परंपरेप्रमाणे दही आणि साखरेचा गोड पदार्थ दिला.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाल्या आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवस प्रचार थांबवल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झेडपी निवडणुतीच्या प्रचारासाठी आज सांगलीत जाणार आहेत. सांगलीतील वाळव्यात आज ते प्रचार सभा घेणार आहेत.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरात लिहिलं की, अजित पवार महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले. हा विक्रम आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, पण ते होऊ शकले नाहीत. अजितदादांनी ज्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केले त्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दादांचा अनुभव, आवाका, लोकप्रियता जास्त होती, पण नशिबाने त्यांना या बाबतीत साथ दिली नाही. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपच्या सोबत गेले व मुख्यमंत्री झाले. यावर दादा गमतीने म्हणाले, “ही ऑफर मला आली असती तर शिंद्यांच्या आधी मी गेलो असतो!” पण भाजपच्या सोबत दादा गेले व उपमुख्यमंत्री पदावरच स्थिरावले. ते भाजपबरोबर गेले, पण विचारांची चौकट मोडली नाही. उदारमतवादी, निधर्मी म्हणूनच ते काम करीत राहिले. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांप्रमाणे ते नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात हजेरी देण्यासाठी गेले नाहीत. ते लवचिक होते, पण फार झुकले नाहीत,' असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन नवी दिल्लीतील कर्तव्य भवनातील अर्थ मंत्रालयात दाखल झाल्या आहेत. त्यानंतर त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अर्थसंकल्पाची प्रत सादर करणार आहेत. त्यानंतर अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तो 11 संसदेत सादर केला जाईल.
आजच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय घोषणा होतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. शिवाय या अर्थसंकल्पात सोने-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडतील.11 वाजता निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.