

कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशिन चौक या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाला ऑक्टोबर 2018 मध्ये मान्यता मिळाली होती, पण भूसंपादन न झाल्याने ते रखडले होते. आता भूसंपादन अंतिम टप्प्यात आल्याने कामाला गती मिळणार आहे.
मध्य रेल्वेकडून येत्या रविवारी 8 फेब्रुवारीला मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मध्य रेल्वेनं हा मेगाब्लॉक मुंबई विभागाच्या रुळ,लोकलची देखभाल आणि दुरुस्तीसाठी जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या लोकल उशिराने धावण्याची शक्यता आहे.
गेले अनेक दिवस चंद्रपूर महानगर पालिकेमधील काँग्रेसचा गट नोंदणीचा वाद आज अखेर संपुष्टात आला. काँग्रेसच्या विजयी झालेल्या सर्व 27 नगरसेवकांनी नागपूर विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी केली. यावेळी राजेश अडूर यांची काँग्रेसचे गट नेते म्हणून नोंदणी करण्यात आली. आता पक्षात कुठलाही गट नसून सर्व नगरसेवक हे एकाच म्हणजे काँग्रेसच्या गटाचे असून चंद्रपूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचाच महापौर होणार असा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारीला होणाऱ्या महापौर निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी बारामती येथील ‘सहयोग’ या निवासस्थानी अजित दादांवर प्रेम करणारे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
याठीकाणी उपस्थित सर्वांच्या सहवेदना पवार कुटुंबीयांनी एकत्रितपणे स्वीकारल्या. तसंच यावेळी जेष्टनेते शरद पवारांसह, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार तसेच पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
चंद्रपुरमध्ये भाजपमध्येही महापौर पदावरून गटबाजी उफाळून आल्याचे दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी अधिकृत नाव जाहीर केले असता, ऐनवेळी दुसऱ्याच उमेदवाराने अर्ज भरल्याने चंद्रपुरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी महापौरपदासाठी संगीता खांडेकर यांचे नाव निश्चित केले होते. पक्षादेशानुसार खांडेकर यांनी नामांकन अर्जही दाखल केला आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते रघूनाथ घुटूकडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे यामुले वातावरण तणावाचे झाले आहे...
रघूनाथ घुटूकडे यांनी चेतन सिंह केदार यांच्याकडे दोन मतदान ओळखपत्र असल्याचे प्रकरण समोर आणले आहे.
याला प्रतिउत्तर म्हणून केदार यांच्या समर्थकांनी देखील घुटूकडे यांना धमकी दिली आहे.
नांदेडमध्ये एकाच गावात सहा महिन्याच्या कालावधीत 15 हजार 569 जन्म प्रमाणपत्रांची नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकणात आंतरराज्यीय टोळी असल्याचा संशय असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील सावळेश्वर गावाची लोकसंख्या 1700 इतकी आहे. आणि या गावातुन सहा महिन्यातच्या काळात एकूण 15 हजार 569 जन्म प्रमाणपत्र काढण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर चौकशी समितीच्या अहवालानंतर उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा परिषदसाठी 73 जागांसाठी उद्या मतदान प्रशासन सज्ज
राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषदेवर पुन्हा झेंडा फडकवण्याचे असणार आव्हान
2017 मध्ये राष्ट्रवादीच्या 43 जागा निवडून आल्या होत्या. यावेळी भाजपाने कंबर कसली आहे.
जिल्हा परिषद तसेच मावळ पंचायत समितीसाठी उद्या प्रत्यक्षात मतदान पार पडणार आहे. त्यासाठी पुर्वतयारी पुर्ण झाल्याचे पहायला मिळतं आहे.
त्याची पुर्वतयारी आज मावळ तालुका तहसीलदार कार्यालय परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ST कंपनीच्या 90 कोटींच्या तोट्याच्या अफवेला खंडन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की ही अफवा खोटी आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचे पगार सात तारखेपूर्वीच देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर तोडगा निघाला आहे.
सुनेत्रा पवार यांच्या घाईघाईत झालेल्या शपथविधीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं. दु:खद घटना घडल्यानंतर इतक्या लवकर शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसांना पटलेलं नाहीये. म्हणून मी त्यावेळेला माझी भावना व्यक्त केली. त्यामुळे जर कोणाचा काही गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणं घेणं नाही. परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
नाशिक महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. भाजपच्या हिमगौरी आडके महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांची आज बिनविरोध निवड झाली. याबाबत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी अधिकृतपणे घोषणा केली. नागरिकांमध्ये या निकालामुळे आनंदाचं वातावरण आहे. भाजपच्या या विजयामुळे नाशिकमध्ये आगामी काळात नगरकारभारात मोठे बदल अपेक्षित आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे उपमहापौर झाले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे नाव अंतिम करतील, तोच छत्रपती संभाजीनगरचा उपमहापौर होईल, असे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. उपमहापौरपदासाठी राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी अर्ज भरला होता. तर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या आदेशानुसार अनिता घोडेले, शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट आणि माजी महापौर त्र्यंबक तुपे हेही अर्ज भरणार होते, त्यामुळे शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला होता. मात्र, एकनाथ शिंदे जो आदेश देतील, तोच संभाजीनगरचा उपमहापौर होणार आहे, असेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
विमान दुर्घटना प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ओएसडी अनिल ढेकलेंचाही जबाब नोंदविण्यात येणार आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूची सीआयडीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार पुण्याच्या पोलिसांनी यापूर्वी अजितदादांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांचा जबाब नोंदविला आहे. सोलवट हे अजितदादांचे शेड्यूल्ड लावण्याचे काम पाहत होते.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम यांची निवड झाली आहे. उपमहापौर म्हणून जनसुराज्य शक्तीचे अक्षय जरग यांची निवड झाली. महायुतीचे निकम आणि उपमहापौर जरग यांना 46 मते पडली. काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार सचिन शेंडे आणि उपमहापौर यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवारांना 35 मते मिळाली. पिठासन अधिकारी आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडला.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत उपमहापौरपदावरून शिवसेनेत नाराजीनाट्य रंगले आहे. एकाच पदासाठी शिवसेनेतूनच दोन अर्ज दाखल झाले आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी अर्ज भरायला लावल्याची चर्चा आहे. दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या समर्थकानेही उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे शिवसेनेतील नाराजी नाट्य चव्हाट्यावर आले आहे.
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे यांची, तर उपमहापौरपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मनोज चौधरींची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आलेली आहे.
मला कोणी डिवचलं आणि माझ्या नादाला लागला तर मीसुद्धा छत्रपतींची औलाद आहे, हे लक्षात ठेवा. वेळ आली तर मी कोणालाच सोडणार नाही, असा सज्जड इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.
ओला-उबर आणि रिक्षाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ७ फेब्रुवारीला कॅब आणि रिक्षा चालकांचा संप असणार आहे. कॅब ड्रायव्हर आणि रिक्षा चालकांनी बंदची हाक दिली आहे. खाजगी कंपन्यांच्या मनमानी भाडे आकारणी आणि बेकायदा बाईक टॅक्सी सेवांच्या निषेधार्थ हा संप पुकारला आहे. महाराष्ट्र कामगार सभा आणि भारतीय गिग कामगार मंचाने बंदची हाक दिली आहे. परिवहन विभाग बेकायदेशीर सेवांवर कारवाई करत नसल्याचे संघटनांन म्हटलं आहे. यामुळे राज्यातील ओला, उबर, रॅपिडो, रिक्षा सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो.
नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांची निवड झाली आहे. हिमगौरी यांनी सीमा पवार यांना माघार घेण्याची विनंती केली. त्यानंतर पवार यांनी माघार घेत माघार पत्रावर स्वाक्षरी केली. त्यामुळे हिमगौरी यांची बिनविरोध निवड झाली.
पिंपरी-चिंचवडच्या महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे यांची महापौरपदी निवड झाल्याची औपचारिक घोषणा बाकी आहे. विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने बिनविरोध निवड झाली.
शरद पवार हे बारामतीमधील अजित पवारांच्या सहयोग सोसायटीमधील घरी पोहचले आहेत. आज अजित पवार यांच्या दशक्रिया विधी आहे. हा विधी घरगुती असून फक्त पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित आहेत.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे तब्बल 66 हजार जमीन विकून एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वसईतील नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेमंत पाटील, धर्मेश शहा, दिपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि इतर साथीदारांविरुद्ध नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेतील पराभवानंतर राज ठाकरे पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना संघटनात्कम बांधनी मजबुत करण्याचे आदेश दिले आहेत. 2029 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आत्तापासून करण्याची सुरुवात देखील मनसेने केली आहे.
लोकभेत नरेंद्र मोदी आले नाहीत. त्यावरून राहुल गांधी ट्विट करत नरेंद्र मोदींना टोला लगावला. ते म्हणाले, प्रश्नांना इतके का घाबरता, सत्याची इतकी भीती वाटत होती की त्यांना जे योग्य वाटले तेच केले.
टँकर अपघातानंतर पुन्हा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुक कोंडी झाली आहे. विकएन्डमुळे एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या वाढली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गीकेवर वाहतुक कोंडी झाली असून खंडाळा येथे बायपाय करीत दोन्ही मार्गावरून पुण्याकडे वाहन सोडण्याचा प्रचाशासनाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गटनोंदणी झालेली नाही. वैधानिक समित्यांमध्ये विरोधकांवर मात करण्यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेण्याची रणनीती महायुतीने आखली आहे, मात्र तांत्रिक मुद्द्यांमुळे ही प्रक्रिया रखडल्याची चर्चा आहे.एकनाथ शिंदेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांना सोबत घेऊन संयुक्त गट तयार करण्याचा तयारी असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.