आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. दादांना निरोप देताना बारामतीकर व अवघ्या महाराष्ट्रातून आलेले समर्थक गहिवरले. मुलगा पार्थ पवार व जय पवार यांनी अजितदादांच्या पार्थिवाला
आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत लाखोंचा जनसमुदाय जमला आहे. अजित पवार अमर रहे च्या घोषणा दिल्या जात आहेत. दादा परत या… दादा परत या… अशाही घोषणा दिल्या जात आहे.
चंद्रकांत पाटील गणेश नाईक, पंकजा मुंडे, विजयकुमारे गोरे, संजय राठोड, रितेश देशमुख, राजेंद्र गवई, रामदार आठवले यांच्याकडून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतले अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. गेल्या काही काही दिवसांपासून छगन भुजबळ आजारी आहेत. पण तरीही काल त्यांनी अपघातस्थळी जाऊन भेट दिली होती.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली असून आपल्या लाडक्या व दमदार सहकाऱ्याला अखेरचा निरोप दिला आहे. मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यासह अनेक दिग्गज नेते अजितदादांना श्रद्दांजली अर्पण करत आहेत.
जड अंत:करणाने पवार कुटुंबाने अंत्यविधी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमला आहे. दादांना निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत दाखल झाले आहेत.
अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत पोहचले आहे. बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत दाखल झाले आहेत.
अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला, थोड्याच वेळात विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार
काटेवाडीत अजित पवारांना शासकीय मानवंदना. पार्थिव आता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आणलं जाणार.
अजित पवारांच्या अंतिम संस्कारासाठी अभिनेता रितेश देशमुख काटेवाडीत पोहोचले
अजित पवारांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा न काढता ते थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नेलं जाणार आहे.
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव सध्या काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी ठेवलं आहे. तर आता शरद पवार देखील काटेवाडीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत.
पुढील अर्धा तासाच्या आत अजित पवार यांचे पार्थिव थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नेलं जाणार आहे. ११ वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा न काढता अजित पवारांचे पार्थिव थेट मैदानावर नेले जाणार आहे. अंत्यसंस्काराचे सगळे विधी मैदानात संपन्न होणार असून यावेळी पोलिसांकडून मानवंदना देण्यात येईल त्यानंतर अजित दादा यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात येईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुळगाव असलेल्या काटेवाडी येथे अजित पवारांचे पार्थिव नागरिकांना अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवलं आहे. शिवाय सध्या संपूर्ण पवार कुटुंबिय काटेवाडीत दाखल झाले आहेत. तर अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी काटेवाडीतील निवासस्थानी हजारो नागरिकांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी देशभरातली अनेक दिग्गज नेते बारामतीत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी बारामती विमानतळावर पोलिसांचं पथक आणि NDRF पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. अत्यंविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर रात्री उशिरा फलटण जवळच्या तरडगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी दाखल करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.