Lok Sabha Election 2024 Result : मतमोजणी केंद्राभोवती कडक निर्बंध, 'पेन' नेण्यास सुद्धा मज्जाव...

Lok Sabha Election : मतमोजणीच्या ठिकाणी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी इलेक्ट्रानिक्स उपकरण नेण्यास बंदी घालताना, खासगी वाहन, संबंधित पक्षाच्या उमेदवारांच्या चिन्हांचे प्रदर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Ahmednagar
Ahmednagarsarkarnama

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचा निकाल 48 तासांवर आला आहे. नगर जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झालं असून, मतमोजणी ठिकाणी कडक पोलिस सुरक्षासह खासगी व्यक्तींना पेन, लॅपटाॅप, वायरलेस सेट आणि मोबाईलला बंदी घातली आहे.

नगर दक्षिण आणि शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयडीसीतील वखार महामंडळात होत आहे. मतमोजणीच्या ठिकाणापासून दोनशे मीटचर परिसरात मोबाईल, काॅर्डसेल फोन, वायरलेस सेट, मोबाईल, लॅपटाॅप, ध्वनिक्षेपक आणि इतर इलेक्ट्राॅनिक्स उपकरणांवर बंदी घातली आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी खासगी वाहन, संबंधित पक्षाच्या उमेदवारांच्या चिन्हांचे प्रदर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे. संपूर्ण मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे निगराणी असून केंद्रात पेन सुद्धा घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश मतमोजणी संपेपर्यंत आदेश राहणार आहे. तसेच मतमोजणी परिसरात कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha Election) 13 मे रोजी मतदान झाले. मतमोजणी चार जून होत आहे. मतमोजणीसाठी दीड हजार कर्मचारी आणि अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय होणार आहे.

Ahmednagar
Narendra Khedekar: बुलडाण्यात नरेंद्र खेडेकर महायुतीला जड जाणार ? | Buldhana Lok Sabha |

शिर्डी लोकसभा मतदारसंघ :

216-अकोले, 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, 217-संगमनेर 278 मतदान केंद्र 20 फेऱ्या, 218-शिर्डी 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या, 219-कोपरगाव 272 मतदान केंद्र 20 फेऱ्या, 220-श्रीरामपूर 311 मतदान केंद्र 23 फेऱ्या तर 221- नेवासा 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या होणार आहेत.

नगर लोकसभा मतदारसंघ :

222-शेवगाव पाथर्डी 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या, 223-राहुरी 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, 224-पारनेर 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या,, 225-अहमदनगर शहर 288 मतदान केंद्र 21 फेऱ्या, 226-श्रीगोंदा 345 मतदान केंद्र 25 फेऱ्या तर 227-कर्जत जामखेड 356 मतदान केंद्र 26 फेऱ्या होणार आहेत.

Ahmednagar
Nashik Teacher Constituency Election : विखेंना थेट भिडणारे विवेक कोल्हे आमदारकीसाठी मैदानात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com