Ajit Pawar : अजित पवार 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला न जाताच माघारी फिरले, खरं कारण आलं समोर

Ajit Pawar mazi ladki bahin yojana nashik event : कार्यक्रम स्थळापासून माघारी फिरल्याने उपमुख्यमंत्री नाराज तर नाही ना? अशी देखील चर्चा सुरू झाली होती. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री पवार यांना पुण्याहून निघण्यास काही विलंब झाला होता.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाची तयारी गेले अनेक दिवस नाशिकमध्ये सुरू होती. हा कार्यक्रम आज (शुक्रवारी) झाला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी शहरात दाखल झाले. नियोजित वेळेनुसार हा कार्यक्रम सुरू झाला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला पोहोचू शकले नाही. त्यामुळे अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला.

उपमुख्यमंत्री पवार पुण्याहून खास विमानाने या कार्यक्रमासाठी नाशिकला रवाना झाले होते. दुपारी त्यांचे ओझर विमानतळावरती आगमन झाले. उपमुख्यमंत्री पवार विमानतळावर असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण संपत आले होते. मात्र, कार्यक्रमस्थळी न जाता अजित पवार माघारी फिरले.

कार्यक्रमाला जायचे असल्यास किमान अर्धा तासाचा कालावधी अपेक्षित होता. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच गोंधळात पडले. शेवटी त्यांनी कार्यक्रमाला न जातात आल्या पावली परत जाणेच त्यांनी पसंत केले.

Ajit Pawar
Maharashtra Band : मोठी बातमी! महाविकास आघाडीत 'महाराष्ट्र बंद'वरुन गोंधळ; पवारांकडून बंद मागे; काँग्रेस अन् ठाकरे गट ठाम

कार्यक्रम स्थळापासून माघारी फिरल्याने उपमुख्यमंत्री नाराज तर नाही ना? अशी देखील चर्चा सुरू झाली होती. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री पवार यांना पुण्याहून निघण्यास काही विलंब झाला होता. सध्या पावसाळी वातावरण असल्याने देखील विमान प्रवासाचा कालावधी वाढला. त्यामुळे त्यांना कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहता आले नाही. अजित पवार कार्यक्रमस्थळी पोहोचेपर्यंत कार्यक्रम संपला असता. त्यामुळे अजित पवार यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला.

नाशिकच्या कार्यक्रमाची तयारी विविध शासकीय यंत्रणांनी गेली आठवडाभर आधी केली होती. आठवडाभर सर्व यंत्रणा राबत होती. कार्यक्रमाच्या दिवशी वरूणराजाने हजेरी लावली. त्यातच उपमुख्यमंत्री पवार उशिरा पोहोचल्याने कार्यक्रमाला न जाताच माघारी फिरले. त्यामुळे नाशिकचा कार्यक्रम हा चर्चेचा विषय ठरला.

(Edited By Roshan More)

Ajit Pawar
Video Nepal Bus Accident : नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळली, 16 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील लोकांचाही समावेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com