Chhatrapati Sambhaji Raje Politics: छत्रपती संभाजी राजे संतापले, म्हणाले नाशिकच्या आमदारांनी...

Chhatrapati Sambhaji Raje; Sambhajiraje questioned Why Uddhav Thackrey is with Congress?-यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकारण गढूळ झाल्याचा दावा स्वराज्य संघटनेचे छत्रपती संभाजी राजे यांनी केला.
Dashrath Patil & Chhatrapati Sambhajiraje
Dashrath Patil & Chhatrapati SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

Assembly election 2024: महाराष्ट्रात सध्याचे राजकारण गढूळ झाले आहे. कोणता नेता कुठे जातो आहे? कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत जात आहे? याचे तारतम्य राहिले नाही. त्यामुळे जनतेला अतिशय जागरूक होऊन मतदान करावे लागेल.

छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचे उमेदवार माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासाठी सभा झाली. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या राजकीय भूमिकेविषयी चांगलेच कोरडे ओढले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने काय राजकीय धोरण स्वीकारले आहे? असा प्रश्न केला.

Dashrath Patil & Chhatrapati Sambhajiraje
Girish Mahajan Politics: सहा वेळा निवडून येण्याचे रहस्य काय?, मंत्री गिरीश महाजन यांनी उलगडले रहस्य..

ते म्हणाले, राज्यातील सध्याचे राजकारण अतिशय गढूळ झाले आहे. असे पूर्वी कधीही झाले नव्हते. गद्दारी, बेईमानी या भोवतीच सध्याचे राजकारण फिरत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पक्ष काँग्रेस पक्षासोबत कधीही युती करणार नाही, असे सांगितले होते.

Dashrath Patil & Chhatrapati Sambhajiraje
Saroj Ahire Politics: पंतप्रधान मोदींच्या सभेने सरोज अहिरे यांच्या महायुतीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत का जात आहेत? हा गंभीर प्रश्न आहे. खुर्चीसाठी ते महाविकास आघाडी सोबत गेले आहेत. ही गद्दारी नाही का? असा प्रश्न त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करतात आणि लगेच काही दिवसातच तेच अजित पवार भाजपसोबत जातात. हे कोणते राजकारण चालू आहे.

यामध्ये महाराष्ट्राचे काय होईल, असा सर्वसामान्यांचा सवाल आहे. शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. आता तोच पक्ष काँग्रेस सोबत आहे. याला काय म्हणणार?. हे राजकारण कारल्यासारखे कडू झाले आहे.

पश्चिम मतदार संघातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार माजी महापौर दशरथ पाटील यांच्या आक्रमक भाषणाचे त्यांनी कौतुक केले. श्री पाटील यांचे भाषण नाशिकप्रमाणेच विधिमंडळात देखील झाले पाहिजे. ते नाशिककरांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वराज्य पक्षांने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 40 उमेदवार दिले आहेत. यातील कोणीही प्रस्थापित राजकीय नेता नाही. सर्वच्या सर्व घराणेशाही आणि प्रस्थापित यापासून अलिप्त असलेले आहेत. आमच्याकडे पैसा नाही, मात्र महाराष्ट्राच्या हिताच्या संकल्पना घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com