Dhule Lok Sabha Exit Poll 2024 : धुळ्यात भाजप 'सेफ'; डॉ. भामरेंची होणार हॅट्‌ट्रीक ?

lok sabha election 2024 exit poll : पोलस्टॅट संस्थेच्या एक्झिट पोल मध्ये धुळ्यात काँग्रेसला फटका बसणार..
Subhash Bhamre, Shobha Bachhav
Subhash Bhamre, Shobha BachhavSarkarnama

Dhule Loksabha 2024 News : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे उमेदवार आहेत. काँग्रेसच्या डॉ शोभा बच्छाव त्यांच्या विरोधात लढत देत आहे. ही लढत अत्यंत चुरशीची झाली.शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यामध्ये टीव्ही-9 या वृत्तवाहिनीवरील पोलस्टॅट संस्थेचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आला आहे.

या एक्झिट पोलमध्ये धुळे मतदार संघात भारतीय जनता पक्षाने आपली जागा राखताना दिसत आहे. येथील माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हॅट्‌ट्रीक करणार असे चित्र आहे.धुळे (Dhule) मतदार संघातून काँग्रेसने माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली होती. डॉ बच्छाव या नाशिकच्या आहेत. त्यामुळे बाहेरचा उमेदवार दिल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.

त्यामुळे काँग्रेसचे (Congress) जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी राजीनामा दिला होता. पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. धुळ्याचे जिल्हा अध्यक्ष सनेर यांनीही राजीनामा दिला होता. मात्र पुढे ते प्रचारात सक्रिय झाले. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने येथे प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र एक्झिट पोल मध्ये काँग्रेसला येथे धक्का बसला आहे.

Subhash Bhamre, Shobha Bachhav
Amravati Lok Sabha Election 2024 Exit Poll: बच्चू कडू फॅक्टर फेल; अमरावतीत पुन्हा नवनीत राणाच? काय सांगतोय एक्झिट पोल...

या मतदारसंघातून भाजपने 2014 च्या निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांना संधी दिली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या अंबरीश पटेल यांच्या विरोधात निवडणूक लढवून तब्बल सव्वालाखांपेक्षा अधिक फरकाने निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यामुळे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 2019 मध्ये देखील त्यांनाच पक्षाने उमेदवारी दिली. या निवडणुकीतही डॉ. भामरे यांनी विजय मिळविला. सध्या भामरे यांच्याकडे संरक्षण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांची पक्षातील कामगिरी लक्षात घेत तिसऱ्यांदा त्यांच्यावर भाजपने जबाबदारी टाकली होती. त्यांच्या विरोधात डॉ. शोभा बच्छाव रिंगणात उतरल्या होत्या.

(Edited by : Chaitanya Machale)

Subhash Bhamre, Shobha Bachhav
Lok Sabha Exit Poll Results 2024 : नाशिकात ठाकरे करून दाखविणार, राजभाऊ वाजे दिल्लीला जाणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com