Rajendra Vikhe Patil News : नाशिकमध्ये नवीन ट्वीस्ट; राजेंद्र विखेंच्या फेसबुक पोस्टची चर्चा :...'पर अपनों को नही मार सकते!'

Rajendra Vikhe Patil News : राजेंद्र विखे पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्याचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.
Rajendra Vikhe Patil, Satyajit Tambe
Rajendra Vikhe Patil, Satyajit TambeSarkarnama
Published on
Updated on

Rajendra Vikhe Patil News : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. सुरुवातीपासून या मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. त्यातच आता या मतदार संघात वेगळीच चर्चा रंगली आहे. राजेंद्र विखे पाटील यांनी फेसबुकवर आज (ता.२९) सायंकाळी एक पोस्ट शेअर केली आहे, त्याचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.

भाजपकडून राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe Patil) यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, नाशिक पदवीधरमध्ये भाजपने (BJP) कोणालाच उमेदवारी दिली नाही. राजेंद्र विखे यांनी या मतदार संघात मोठ्या प्रमाणात काम केले होते. पक्षाने त्यांना आधी मतदार नोंदणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली. त्यानंतर पक्षाने त्यांना उमेदवारी संदर्भात विचारणाच केली नसल्याची चर्चा होती.

Rajendra Vikhe Patil, Satyajit Tambe
बारामतीतून लोकसभा लढवण्याची माझी तयारी; शिवतारेंनी रणशिंग फुंकले

नाशिकमध्ये आपला उमेदवार न देता, सत्यजीत तांबे यांना छुपा पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या संदर्भात राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी थेट तांबे यांना पाठिंबा दिला नाही. मात्र, स्थानीक पातळीवर तांबे यांचे काम भाजपचे पदाधिकारी करत असल्याचे सांगितले.

त्यानंतर राजेंद्र विखे पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ''शतरंज का एक नियम बहुत उम्दा है, चाल कोई भी चलो पर अपनों को नही मार सकते!'' असे राजेंद्र विखे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मतदार संघात एकच चर्चा रंगली आहे.

भाजपने थेट आपला उमेदवार मैदानात न उतरवता सत्यजीत तांबे यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राजेंद्र विखे यांचे आमदार होण्याचे स्वप्न अजुन तरी अपूर्णच राहिले आहे. या मतदार संघात विखे विरुद्ध तांबे असा सामना होईल, असे सांगितले जात होते. मात्र, विखे यांचे कट्टर विरोधक तांबे यांनाच भाजपने स्थानिक पातळीवर पाठिंबा दिला.

Rajendra Vikhe Patil, Satyajit Tambe
Bharat Jodo Yatra : काँग्रेसने 'भारत जोडो' यात्रेतून नेमकं काय मिळवलं?

त्यामुळे मतदार संघातील सर्वच गणिती बदली आहेत. उद्या मतदान असताना राजेंद्र विखे यांनी शेअर केलेल्या पोस्टचा अर्थ काय? अशी चर्चा सुरु आहे. सत्यजीत तांबे यांच्या समोर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे विखे यांनी नोंदणी केलेल्या ४० हजार मतांची तांबे यांना गरज आहे. असे असताना राजेंद्र विखे यांच्या मनात नेकमके काय आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच या फेसबुक पोस्ट मागे विखे पाटील घराण्यातील अंतर्गत नाराजी तर नाहीना अशी चर्चा होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com