अभोणा : सध्या सोशल मीडियावर (Social Media) दिवाळीच्या (Diwali) असंख्य शुभेच्छांसह (Wishesh) ‘शिंदे, फडणवीस साहेब; झाली का तुमची दिवाळी’ (Eknath Shinde & Devendra Fadanvis) हा व्हिडीओ (Viral Video) सर्वत्र व्हायरल होऊन प्रत्येकाला आत्मचिंतन करण्यास भाग पाडतो आहे. ऐन दिवाळीत सोशल मीडियावर राज्य सरकारवर अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रश्नांच्या सरबत्तीने त्याची चर्चा आहे. (Heavy rainfall & Crop losses issues raised on Social media platform)
या व्हिडीओत सत्ता संघर्ष, फोडाफोडीचे राजकारण, चिन्ह आणि अस्तित्वाची लढाई, दोन दसरा मेळाव्यानिमित्त पैशांची झालेली उधळपट्टी आणि दुसऱ्या बाजूला विदर्भ, मराठवाडा, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली व पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने घातलेले थैमान, त्यात शेतकऱ्यांची वाहून गेलेली पिके, कांदा, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग, टोमॅटो, द्राक्ष, संत्री, मोसंबी, केळी, कपाशी, भाजीपाला आदी पिकांचे प्रचंड झालेले नुकसान. त्यानिमित्ताने तो चर्चेचा विषय आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश, आत्महत्या. याबाबत हृदय पिळवटून टाकणारे दृश्य व निवेदन, सारं काही मन सुन्न करून टाकतं. काही रोखठोक सवालही या व्हिडीओत केले आहेत. जसेकी ‘सरकार आणि विरोधकांकडे मोक्कार पैसा दिसतोय. ढाल- तलवार, मशाल या संघर्षातून थोडं बाहेर या, तुमची दिवाळी झाली असेल तर थोडंसं इकडेही बघा. शेतकरी नावाची व्यक्ती कळतेय का तुम्हाला, म्हणे सगळ्या जगाचा पोशिंदा, सारं शेत त्याचं पाण्याखाली गेलंय. अहो मंत्री साहेब शेताच्या बांधावर तरी येऊन बघा, मग कळेल दुष्काळ म्हणजे काय असतं ते.
शेतकऱ्यांच्या घरातही लहान लहान लेकरं आहेत हो, दिवाळी त्यांचीही असते, भले तुमच्यासारखी नसेल. आभाळ फाटल्यागत पाऊस पडतोय, बळीराजा उद्ध्वस्त झालाय हो, राज्याचे कृषीमंत्री म्हणतायेत ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही. अहो निदान ज्या भागात सर्वाधिक पाऊस झाला त्या भागात तरी ओला दुष्काळ जाहीर करावा. सारी पिकं पाण्यावर तरंगतायेत. अजून काय अपेक्षित आहे आपल्याला. आता माणसं तरंगण्याची वाट पाहताय का’? असे प्रश्न मांडून मदतीची आळवणी केली आहे. विविध प्रश्न घेऊन वास्तव दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने बळीराजाचा हिरावून घेतलेला घास, नद्या- नाल्यांना आलेल्या महापुरात उद्ध्वस्त झालेले संसार. या सर्वांना गरज आहे सरकारच्या आर्थिक मदतीची. कितीही संकटं आली तरी हा बळीराजा मातीत पाय रोवून उभा राहतो. पुन्हा नव्या आशेने संकटाशी दोन हात करतो. फक्त गरज आहे त्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याची. व्हायरल व्हिडीओची सर्वत्र विशेषतः ग्रामीण भागात चर्चा होत आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.