Padmakar Valvi: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात आलेल्या माजी मंत्र्याला व्हायचंय आमदार! काँग्रेसमध्ये घरवापसी?

BJP leader Padmakar Valvi will join Congress: अनेक दिवसापासून पद्माकर वळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि राज्य सरकारच्या विरोधात वक्तव्य करीत आहेत. विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे
Padmakar Valvi
Padmakar ValviSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar News: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले माजी मंत्री पद्माकर वळवी पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता आहे. पद्माकर वडवी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एखाद्या पक्षाने मला तिकीट दिलं तर मी त्या पक्षातून निवडणूक लढणार असे संकेत पद्माकर वळवी यांनी दिले आहेत.

'मला चांगली संधी मिळाली तर मी त्या संधीचा फायदा घेणार,' असे म्हणणारे पद्माकर वळवी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसापासून पद्माकर वळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि राज्य सरकारच्या विरोधात वक्तव्य करीत आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. शहादा तळोदा मतदारसंघ किंवा अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

"जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात निर्णय घेईल त्याला जमिनीत गाडल्या शिवाय शांत बसायचं नाही. आदिवासी आमदार, खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. राजीनामा देण्याची सरकारला फक्त धमकी द्या," असा सल्ला वळवी यांनी नुकताच आमदार, खासदारांना दिला होता.

Padmakar Valvi
Shiv Sena News: ठाकरे-शिंदे गटात दिलजमाई; माजी आमदाराचा असाही दिलदारपणा

आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या पद्माकर वळवी यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते राज्याचे क्रीडामंत्री होते. नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात वळवी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे.

१९९९ ते २०१४ या कालावधीत ते तळोदा आणि शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. २००९ ते २०१४ या काळात पद्माकर वळवी हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते. पद्माकर वळवी यांची मुलगी काँग्रेसमध्ये सक्रिय असून त्या नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये वर्चस्व असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com