खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीविषयी सस्पेन्स?

नाशिक लोकसभेसाठी भाजप, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची चाचपणी मात्र शिंदे गटाचे काहीच नाही.
Manikrao Kokate, Hemant Godse & Rahul Dhikle
Manikrao Kokate, Hemant Godse & Rahul DhikleSarkarnama

नाशिक : शिर्डी (Shirdi) येथील विचारमंथनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi front) घटक म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांतर्गत उमेदवारीची चाचपणी सुरु केली. शिवसेना (Shivsena) देखील याबाबत अतिशय सावधपणे पावले टाकत आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) स्वतंत्रपणे उमेदवारीवर काम सुरु केले आहे. या सर्व राजकीय घडामोडींत भाजपला समर्थन दिलेल्या शिंदे गटाच्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या उमेदवारीविषयी मात्र सस्पेन्स वाढतच चालला आहे. (If BJP face loksabha alone then what about Hemant Godse`s Political future)

Manikrao Kokate, Hemant Godse & Rahul Dhikle
शिवसेनेचा आरोप, महापालिका अभियंत्याने घेतले अडीच लाख!

स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे इच्छुकांची कोंडी झाली असताना दुसरीकडे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. नाशिकमध्ये भाजपकडून महापालिकेच्या राजकारणाची जाण असलेला चेहरा म्हणून आमदार डॉ. राहुल आहेर, माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या नावाची चाचपणी होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करताना दिंडोरीत नरहरी झिरवाळ, तसेच नाशिकमध्ये समीर भुजबळ यांच्यासह ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे.

Manikrao Kokate, Hemant Godse & Rahul Dhikle
ठाकरे गटाच्या प्रकाश वाजेंच्या वाढदिवसाला दादा भुसेंची साखरपेरणी चर्चेत

लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप जवळपास सव्वा दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला तरी २०२४ च्या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार करता लोकसभेचे अडीच मतदारसंघ आहेत. यात नाशिक, दिंडोरी व धुळे मतदारसंघाला जोडलेला मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा मतदारसंघाच्या भागाचा समावेश होतो.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचा डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून तगडा उमेदवार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील लोकसभेचा हक्काचा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यात डॉ. पवार यांना तोडीस तोड देण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे प्रतिनिधित्व करत आहे. शिंदे गट व भाजपच्या वाटाघाटीमध्ये शिंदे गटातून नाशिक लोकसभेच्या जागेची मागणी केली जाईल. त्या वेळी खासदार गोडसे यांचे नाव पुन्हा स्पर्धेत येईल; परंतु भाजपकडून नाशिकचा मतदारसंघ सहजासहजी सोडला जाणार नाही. त्यामुळे आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीकडून चाचपणी

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीत नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादीने या मतदारसंघात नव्या ताकदीने उभे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्या अनुषंगाने माजी खासदार समीर भुजबळ यांच्याबरोबरच सिन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या नावाची चाचपणी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरी, ग्रामीण असा चेहरा लागणार आहे. अधिकाधिक शहरी मतदारांवर पकड, नातेवाईक, मतदारांपर्यंत पोचण्याची क्षमता याबाबी तपासल्या जाणार आहेत. त्याअनुशंगाने भाजपकडून स्पष्ट चेहरा समोर आला नसला तरी चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. पाटील यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देणारे फलक नाशिक लोकसभा मतदारसंघात लावल्याने चर्चेचा विषय ठरले. त्या व्यतिरिक्त पाटील यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारे जवळपास दोन लाख पत्रके वाटली, तसेच अखिल भारतीय महानुभाव पंथाचे संमेलन भरविताना राज्यपातळीवरचे भाजपचे नेते व्यासपीठावर बोलाविल्याने ते लोकसभेची तयारी करत असल्याचे स्पष्ट होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com