ब्राह्मण असल्याचा गर्व, परंतु मार्केटिंग जमत नाही!

अमृता फडणवीस यांची सर्वशाखीय ब्राह्मण महासंघातर्फे दीपावली स्नेहमिलनाला हजेरी
Amrita Fadanvis
Amrita FadanvisSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : ब्राह्मण (Bramhin) महासंघ जात- धर्म, पंथ बाजूला ठेऊन अनेकांसाठी झटतो. लोकांमध्ये (Community) जाऊन त्यांच्या इच्छा-आकांक्षा समजून घेतो. ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, परंतु आम्हाला आमची मार्केटिंग करता येत नाही. असे अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी म्हटले आहे. (Amrita Fadanvis attend the bramhin mahasangh confrence in Nashik)

Amrita Fadanvis
तरुणीच्या दुचाकीत सापडला चक्क गावठी कट्टा!

अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे ‘दीपावली स्नेहमिलन २०२२’ कार्यक्रम येथे झाला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पदासाठी कोणतीही मागणी केली नसताना ते मिळाले आहे. यापुढे बहुभाषिक ब्राह्मण महासंघापुढील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही सांगितले.

Amrita Fadanvis
Uttarakhand : उत्तराखंडला चला! महाराष्ट्रातील बड्या उद्योगपतींना राज्यपाल कोश्यारींचे आवाहन

या मेळाव्यास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, की प्रभू श्रीरामाचे नाशिकला चरण लागले. या नगरीत येऊन मला धन्य वाटते आहे. याच पंचवटीत गेल्या बारा वर्षांपासून समाजाच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. त्या कामाची जबाबदारी डॉ. भारती पवार यांच्यासह स्थानिक आमदार यांच्यावर सोपवते. नेशन फर्स्ट हे आपले ब्रीद असल्याने, शुक्ल यजुर्वेद संस्थेची इमारत उभी करण्यासाठी कोण मध्ये येतो ते मी बघते. जे अधिकारी हे काम थांबवत आहेत त्यांची नावे मला कळवा मी पुढे बघते, असा दमही त्यांनी भरला.

गंगा- गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, महंत भक्तिचरणदास महाराज, अनिकेतशास्त्री देशपांडे, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, भगवान पाठक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com