Jalgaon News :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजप यांच्यातील विस्तव कायम आहे, यात आणखी भर म्हणून खडसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भाजप-खडसे वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.(jalgaon milk union election news update)
चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण (mangesh chavan)यांनी जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मुक्ताईनगर मतदारसंघात ऐनवेळी उमेदवारी दाखल करून विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी एकनाथ खडसे यांना खुले आव्हान दिले आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जाला खडसेंनी आक्षेप घेतला आहे. बाहेरच्या तालुक्यातील उमेदवार अशा प्रकारे अन्य मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करू शकत नाही, असे एकनाथ खडसे यांचे म्हणणं आहे.
आज (शुक्रवारी) या अर्जांची छाननी होणार आहे. यात कोणाचे अर्ज बाद होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. चव्हाण यांच्या अर्जावर जोरदार हरकत घेणार असल्याची घोषणा आमदार खडसे यांनी गुरुवारीच केली आहे. त्यांची हरकत नामंजूर झाली तर त्याविरुद्ध अपिल करण्याची तयारीही त्यांनी करून ठेवली आहे.
आमदार चव्हाण यांची मुक्ताईनगरमधील उमेदवारीवर आणखी काय हरकत घेतली जाते आहे? जरी उमेदवारी बाहेरच्या तालुक्यात करता येत असेल तरी त्याला सूचक आणि अनुमोदक मात्र त्याच तालुक्यातील असायला हवेत, अशीही उपविधीत तरतूद आहे, असे आमदार खडसे यांचे म्हणणे आहे. आमदार चव्हाण यांचे सूचक, अनुमोदकही बाहेरच्या तालुक्यातील आहेत. त्यामुळे उमेदवारी टिकणार नाही, असेही खडसे यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.