MIM Vs Mahayuti : यांचं सगळं पोकळ आणि गळकं; MIM म्हणते, 'नाक रगडा'

MIM criticizes government apology : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागितलेल्या माफीनाम्यावर 'MIM'ने निशाणा साधला आहे.
MIM Vs Mahayuti
MIM Vs MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितलेल्या माफीनाम्यावर 'MIM' ने जोरदार टीका केली.

"केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारचा सर्व कारभार भ्रष्टाचाराने माखलेला असून, यांची सर्व विकासकामे पोकळ आणि गळकी आहेत. माफीनामा देखील, असाच पोकळ आहे. माफी मागयाची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावर जाऊन तिथं नाक रगडून माफी मागा", असा घाणाघात 'MIM'चे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केला.

सिंधुदुर्ग इथं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे कोणी सांगायची गरज नाही. पुतळा कोसळला, त्याच दिवशी हा भ्रष्टाचार उघडा पडला. छत्रपतींना देखील या महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराने सोडले नाही. महाराष्ट्राची अस्मितेची खेळ सरकारने चालवला आहे. लोकप्रिय घोषणाबाजीत गुंतलेल्या या सरकारला जनता धडा शिकवणारच, असा इशारा 'MIM'चे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी दिला.

MIM Vs Mahayuti
Rohit Pawar : रोहित पवारांना आठवले 'माफीवीरांचे' कारनामे; मग काय संस्कारसह सर्वच काढलं...

परवेज अशरफी यांनी महायुती भाजप (BJP) सरकारचे सर्वच काढलं. विकास कामांच्या नावाखाली पक्षनिधी वाढवण्यावर सरकारमधील पक्षांचा राजकीय खेळ सुरू आहे. यातून विकास कामांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. यांनी उभारलेले पूल टिकत नाहीत. प्रभू श्रीराम लल्लाचे मंदिर बांधले, ते देखील गळत आहे. नवीन संसद बांधली ती देखील गळते आहे. नवीन रस्ते वाहून गेलेत. रस्त्यांपेक्षा खड्डेच जास्तच दिसतात. महाराष्ट्राची अस्मिता, अभिमान, स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील पोकळ ठेवला. सरकारचे विचारच पोकळ असल्याने आज देशपातळीवर महाराष्ट्राच्या अस्मितेला तडा केला गेल्याचा घाणाघात केला.

MIM Vs Mahayuti
Radhakrishna Vikhe Vs Nilesh Lanke : मंत्री विखेंच्या दिशाभूल राजकारणचं खासदार लंकेंनी सर्वच काढलं

सत्ताधाऱ्यांचे डोके ठिकाण्यावर नाही

महाराष्ट्राच्या अस्मितेला तडा दिल्यानंतर जी माफी मागत आहे, त्यात देखील राजकारण केले जात आहे. याची गडद सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली. छत्रपतींशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुलना केली. वीर सावरकरांच्या कार्याविषयी आम्हाला आक्षेप नाही. पण देशाचे नेतृत्वाने तरी छत्रपतींशी कोणाशी तुलना करायला नको होती. पण राजकारण आणि सत्ते पलीकडे काहीच दिसत नसल्याने सत्ताधाऱ्यांचे डोके ठिकाण्यावर नाही, असा टोला परवेज अशरफी यांनी लगावला.

नाक रगडत, माफी अन् राजीनामा द्यावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छत्रपतींचा पुतळा कोसळण्याची घटना गांभीर्याने घेतली असेल, तर आता देखील वेळ गेलेली नाही. छत्रपतींच्या जन्मस्थळी जावे, तिथे तिघांनी महाराजांच्या समाधीस्थळावर नाक रगडावे आणि माफी मागावी. तसेच राजीनामा द्यावा, अशी मागणी परवेज अशरफी यांनी केली. 'MIM'ने टायमिंग साधत केलेल्या या मागणीवर सत्ताधारी काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com