MLA Saroj Ahire; अहीरराव भगिनीनी माझ्या विरोधात कारस्थान करू नये!

मी लोकप्रतिनिधी असून विकासाच्या कामात कितीही अडथळे आणले तरी काम करीतच राहीन.
MLA Saroj Ahire
MLA Saroj AhireSarkarnama

नाशिक : (Nashik) तहसीलदार राजश्री (Rajshree Ahirrao) आणि अधिक्षक अभियंता अलका अहीरराव (Alka Ahirrao) भगिनीनी माझ्या विरोधात कट कारस्थान रचले आहे. हे प्रकार त्यांनी तातडीने थांबवावे, अन्यथा आगामी विधीमंडळ अधिवेशनात त्यांच्या विरोधात मी हक्कभंग प्रस्ताव दाखल करेल. तसा मला अधिकार आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी पत्रकार परिषदेत दिला. (Saroj Ahire made serious alligation On Tahsildar Rajshree Ahirraon)

देवळाली विधानसभा मतदार संघात दोन भगीनी माझ्या विरोधात कट कारस्थान रचत आहेत. मी मंजूर केलेला शेतकरी हिताचा निधी परस्पर रद्द करुन मला अडचणीत आणण्याचे काम अलका अहिरराव व राजश्री अहिरराव या करीत असल्याचा आरोप आमदार सरोज अहिरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

MLA Saroj Ahire
Raju Shetty News; बिऱ्हाड मोर्चाच्या दणक्याने सहकार मंत्री नरमले!

त्या म्हणाल्या, मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया व प्रसिध्दी माध्यमांमध्ये तहसिलदार राजश्री अहिरराव, त्यांच्या भगिनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव आणि नाशिकरोड देवळाली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्याविषयी बातम्या येत आहेत. त्याला आमदार सरोज अहिरे यांनी आज आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले.

मंगळवारी (ता.१७) पत्रकार परिषद घेऊन अहिरराव भगिनी यांच्याकडून त्यांच्यावर होत असणाऱ्या राजकिय आरोपांचे खंडन केले. आमदार अहिरे यांनी दोन्ही भगिणीचे थेट नाव घेऊन आरोप केले. अलका अहिरराव यांच्या बदलीचा आणि माझा काहीही एक संबंध नाही. आमदार राहूल ढिकले, जे. पी. गावित, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी अलका अहिरराव यांच्या बदलीची मागणी केली होती. यात माझा काडीमात्र संबंध नाही.

राजश्री अहिरराव यांना जिल्हाधिकारी गंगाधर डी. यांनी सुट्टीवरून आल्यावर रुजू करुन घेतले नाही. यात देखील माझा काडीमात्र संबंध नाही. याविषयी त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

यानिमित्ताने आमदार अहिरे आणि वादग्रस्त तहसीलदार अहिरराव यांच्यात पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. आमदार अहिरे यांनी तहसीलदार अहिरराव आणि त्यांच्या भगिनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्या वादग्रस्त कारभाराचा पाढाच वाचला. त्यात अनेक गंभीर गैरप्रकारांचा समावेष आहे. अशा बेलगाम अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून, शासकीय पगार घेऊन व्यक्तीगत राजकीय अजेंडा राबविणाऱ्या अहिरराव यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com