Girish Mahajan News: नाशिक मतदार संघाचा वाद... महाजनांनी सांगितला 'हा' उपाय..!

Mahayuti dispute on seet sharing, Nashik constituency issue resolve with concern : महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सर्व पक्ष परस्पर समन्वयातून सोडवतील...
Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Nashik constituency 2024 : नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण? हा प्रश्न अधांतरी आहे. या संदर्भात रोज नव्या चर्चा घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी वक्तव्य केले आहे.

नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत गेले दोन आठवडे वाद सुरू आहे. या संदर्भात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सातत्याने दावा केला जात आहे. त्याला भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघ नेमका कोणाला हा प्रश्न दिवसेंदिवस वादग्रस्त होत चालला आहे. उमेदवाराची घोषणा त्यामुळेच लांबत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मार्ग सांगितला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Girish Mahajan
Lok Sabha Election: खडसे रिकामे आहेत, मला खूप कामे आहेत; गिरीश महाजनांची बोचरी टीका

महाजन म्हणाले, नाशिक मतदार संघासह राज्यातील चार ते पाच जागांबाबत असाच वाद आहे. महायुतीमध्ये तीन पक्ष आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आमचे नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील महायुतीचे नेते आहे. या तीनही नेत्यांमध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. राज्यस्तरावर महायुतीच्या नेत्यांनी याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. त्यासाठी विविध पावले टाकण्यात आली आहे. चर्चेतून हा प्रश्न सुटेल. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड याबाबत विचार करील.

भारतीय जनता पक्षासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष आहे. त्यात कुठेही वाद किंवा दुमत नाही. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व नेते अतिशय ताकतीने प्रचारात उतरतील. पुढील आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील प्रचाराला सुरुवात होईल. त्यासाठी सर्व नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा होईल, असे देखील महाजन यांनी सांगितले.

Girish Mahajan
NIA News: छत्रपती संभाजीनगरात NIAची मोठी कारवाई; तीन युवक ताब्यात

उत्तर महाराष्ट्रातील सर्व आठ जागा शिवसेना-भाजप युतीकडे आहेत. गेल्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पक्षाला या जागांवर यश मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत देखील सर्व आठ जागा भाजप महायुतीच्या घटक पक्षांना मिळतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

(Edited by - Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com