Mahavikas Aghadi Agitation News : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ का देत नाही?

बागलाण तालुका महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम
Mahavikas Aghadi Agitation
Mahavikas Aghadi AgitationSarkarnama

Mahavikas Aghadi agitation against BJP : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. देशवासीयांमध्ये राष्ट्रभक्तीचा हुंकार भरला. केंद्रात व राज्यात सत्ता असतानाही वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ न देता त्यांच्या नावाचा गैरवापर करून देशातील वातावरण दूषित करण्याचा निंदनीय प्रकार सुरू आहे. (BJP missusing the name of Veer Savarkar for there political Agenda)

भाजपकडून (BJP) या विषयावर सुरु असलेल्या राजकारणाचा निषेध करीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना (Swatantryaveer Savarkar) तत्काळ ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा गौरव करा अशी मागणी बागलाण (Nashik) तालुका महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) करण्यात आली. यावेळी सह्यांची मोहीम राबविण्यात आली.

Mahavikas Aghadi Agitation
Nashik News : सत्यजीत तांबेंचा औद्योगिक जागेसाठी नवा पर्याय!

यावेळी माजी आमदार श्री. चव्हाण म्हणाले, देशवासीयांमध्ये राष्ट्रभक्तीचा हुंकार भरणारे नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचे अमूल्य योगदान देशवासीय कधीही विसरू शकणार नाही. मात्र काही राजकीय पक्ष त्यांच्या नावाचा गैरवापर करून देशातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

भाजपने यापूर्वी आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांची शिफारस ‘भारतरत्न’साठी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेची नऊ वर्षे उलटूनही हे आश्वासन आजही पूर्ण झालेले नाही. सध्या केंद्रात व राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे सरकार असल्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने

Mahavikas Aghadi Agitation
Vikhe Patil News : वाळू ठेकेदारांची राजकीय लॉबीपुढे अस्तित्वाचे संकट!

तत्काळ विशेष अधिवेशन बोलावून सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा यासाठी विधीमंडळात ठराव मांडून केंद्र सरकारकडे तो त्वरित पाठवावा. तसेच केंद्र सरकारने सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून त्यांचा गौरव करावा, असेही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ठाणे येथे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्‍या दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी गजेंद्र चव्हाण यांनी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, विजयराज वाघ, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे, उषा भामरे, शमा दंडगव्हाळ, शरद शेवाळे, अनिल सोनवणे, राजनसिंह चौधरी, ज.ल.पाटील, सुयोग अहिरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com