थोडं थांबा, राष्ट्रवादी भाजपच्या भल्या भल्यांचा आत्मविश्वास घालविणार आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अनिता भामरे यांनी विरोधकांना दिले उत्तर!
Anita Bhamre, NCP
Anita Bhamre, NCPSarkarnama

नाशिक : महापालिका (NMC) निवडणूकीच्या माध्यमातून शहरात सर्वच पक्षांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यामध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार कसे जास्तीत जास्त निवडून येतील असे दावे केले जात आहेत. मात्र भाजपने (BJP) राष्ट्रवादीच्या (NCP) बैठकांवरच टिका केली आहे. त्यांनी थोडा धीर धरावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच भाजपच्या भल्या भल्या नेत्यांचा आत्मविश्वास घालविणार आहे, असे उत्तर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी दिले आहे.

Anita Bhamre, NCP
महाविकास आघाडीने भाजपकडून किमान एव्हढं शिकावंच!

त्या म्हणाल्या, दोन दिवसांपूर्वी सिडको विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी घेतलेल्या बैठकीत भाजप वर टीका केली. दुसर्‍याच दिवशी भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून राष्ट्रवादी काँग्रेस आत्मविश्वास हरवलेला पक्ष असून दिवसा बैठकी घेणारे अपूर्व हिरे रात्री भाजप प्रवेशासाठी नेत्यांशी चर्चा करतात असे विधान केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस आत्मविश्वास हरवलेला पक्ष नसून विरोधकांचा आत्मविश्वास घालविणारा पक्ष आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

Anita Bhamre, NCP
जेव्हा कृषीमंत्री भुसे अनुदान रोखणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात धरणे धरतात!

त्या पुढे म्हणाल्या, २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत शहरात पश्चिम विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार अपूर्व हिरे यांनी उमेदवारी केली होती. त्यात त्यांचा अवघ्या ९७४६ मतांनी पराभव झाला. अपूर्व हिरेंनी मिळालेली मते पाहून भविष्यात पश्चिम मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार हे निश्चित आहे. यातून भाजपच्या मंडळीनी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी राजकीय बदनामी सुरू केली आहे.

राहीला प्रश्न पक्षाच्या आत्मविश्वासाचा तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आजही भाजपचे १०६ आमदार असतांना त्यांना सत्तेबाहेर रहावे लागले आहे. त्यामुळे कोणाचा आत्मविश्वास किती यासाठी हे उदाहरण बोलके ठरेल.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा कठीण परिस्थितीत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोरोना काळात संपूर्ण शहरात व जिल्ह्यात ना नफा ना तोटा या तत्त्वावर सर्व सामान्य जनतेसाठी किराणा माल उपलब्ध करून दिला. शहरातील गोर गरीब लोकांसोबत परराज्यातील मजूरांना मोफत धान्य वाटप, कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी अतिशय सुसज्ज मोफत कोविड सेंटर उभारले. तेव्हा आता वेळ आली आहे नाशिककरांची कोरोना काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने घेतलेल्या कार्याची दखल घ्यायची की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोट्यात नेलेल्या शहर बसमध्ये बसून पून्हा दत्तक जायचे, याचे उत्तर जनता देईलच.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com