Lahu Kanade : मोदी, फडणवीसांनी पिठावरही कर लावला; वाढत्या महागाईवर काँग्रेस आमदार भडकले

MLA Lahu Kanade criticizes central and state governments over rising inflation : देशात वाढलेल्या महागाईला केंद्र आणि राज्य सरकारवर काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी टीका केली.
Lahu Kanade
Lahu KanadeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : काँग्रेसचे श्रीरामपूरमधील आमदार लहू कानडे यांनी केंद्र सरकारवर महागाईवरून निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे, जीएसटीवरून केंद्रासह राज्य सरकारला आमदार कानडे यांनी टार्गेट केले.

"केंद्रातील मोदी सरकार अत्यंत क्रूरपणे निर्णय घेत आहेत. ब्रिटिशांनी मिठावर कर लावला होता. यांनी मिठावरच नाही, तर पिठावर देखील कर लावला आहे. सर्व वस्तूंना जीएसटी लावून महागाईचा आगडोंब भडकवला आहे", असा घणाघात आमदार कानडे यांनी केली.

काँग्रेसचे (Congress) आमदार लहू कानडे यांचा श्रीरामपूरमध्ये जनसंवाद दौरा सुरू आहे. राहुरीमधील नवीन तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन आमदार कानडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारवर निशाणा साधाला. केंद्रातील मोदी सरकारला अत्यंत क्रूरपणे निर्णय घेणारे सरकार असल्याचे आमदार कानडे यांनी म्हटले. श्रीरामपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण नाईक, उद्योजक अंकुश कानडे उपस्थित होते.

Lahu Kanade
Praniti Shinde : इथं महिलाच सुरक्षित नाही, महिला मुख्यमंत्री दूरची चर्चा; प्रणिती शिंदे असं का म्हणाल्या?

आमदार कानडे म्हणाले, केंद्रात मोदी (Narendra Modi) यांचे सरकार आल्यापासून अत्यंत क्रूरपणे निर्णय घेतले. 2014 साली राज्यात फडणवीस यांचे सरकार आले. या दोन्ही सरकारमुळे देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पूर्वी कधीकाळी ब्रिटिशांनी मिठावर कर लावला होता. तर अख्खा देश पेटून उठला होता. परंतु देशातील मोदी सरकारने मिठावरच नाही, तर पिठावरही कर लावला. नोटबंदीचा सर्वात जास्त त्रास गरीबांना झाला. शेतकरी, कष्टकरी, मजूरांसाठी हा निर्णय सैतानी प्रकारचा ठरल्याचा घणाघात आमदार लहू कानडे यांनी केला.

Lahu Kanade
Communist Party of India : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्यात वाढवतोय ताकद; एवढ्या जागांवर आहे डोळा

राज्यातील सरकारला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, व्यापारी, दुकानदारांचे दुःख माहीत नाही, असे सांगून हे सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी असल्याची टीका आमदार कानडे यांनी केली. निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. सध्याचे राजकारण कोणत्या दिशेने चालू आहे हे जनतेला समजले पाहिजे, या दृष्टीने संवाद यात्रा असल्याचेही त्यांनी सांगितले.

31 तलाठी कार्यालय मंजूर

तत्कालीन महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष सहकार्याने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात करण्यात आली. प्रत्येक तलाठी कार्यालयासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. यातील बहुतेक तलाठी कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामेही लवकरच होतील. ग्रामीण भागात सुसज्ज, अशी तलाठी कार्यालय झाल्याने कष्टकरी शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास आमदार कानडे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com