Shanaishwar Devasthan : शनैश्वर देवस्थानच्या कामगारांचे संपाचे हत्यार; जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी 'महामुक्काम' करणार!

Workers strike : कामगार संघटना महासंघ आणि 'सिटू'च्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन
Shanaishwar Devasthan
Shanaishwar DevasthanSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील जगप्रसिध्द श्री शनैश्वर देवस्थानचे कामगार हक्क आणि मागण्यांसाठी सोमवारपासून (ता. 25) संपावर जाणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने कामगारांसाठी मध्यस्थी करावी यासाठी संपकाळात जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या निवासस्थानी 'मध्यस्थी विनंती महामुक्काम' करणार आहेत. कामगार संघटना महासंघ आणि सिटूच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन देण्यात आलं आहे.

श्री क्षेत्र शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थान कामगार युनियन (सीआयटीयू संलग्न) संघटनेचे सर्व सभासद 25 वर्षांपासून कामगार म्हणून कार्यरत आहेत. येथे सर्व कामगार हे नियमित आहेत. देवस्थानचे कार्यकारी अधिकारी व विश्वस्त कामगारांच्या कायदेशीर हक्क आणि मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत.

यापूर्वीचा करारनामा 1 ऑक्टोबर 2003 मध्ये झाला होता. यावेळी समेट अधिकारी म्हणून तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त ए. ह. फुफाटे यांनी सकारात्मक भूमिका बजावली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shanaishwar Devasthan
Ahmednagar Politics : रेल्वे मालधक्क्यावरील 578 माथाडी कामगारांच्या लढ्याला यश; काँग्रेस नेत्याने केला जल्लोष

''श्री शनैश्वर देवस्थान हे भारतासह जगभरात सुप्रसिद्ध आहे. येथील कामगारांचे हक्क अधिकार डावलणे हे कोणत्याच नैतिक व धार्मिक अधिकारात येत नाही. कामगारांमध्ये अनेक महिला भगिनी असून त्यांची ट्रस्ट अक्षरशः श्रमचोरी करत आहे की, काय असे वाटते.

तसेच त्यांच्या पीएफची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. नुकसान भरपाई दिली जात नाही. कोरोना काळातील 18महिन्यांचा राहिलेला अर्धा पगार दिला गेलेला नाही. यावर कार्यवाही झाली पाहिजे.'', अशी मागणी कामगारांनी केली आहे.

याचबरोबर 2003मध्ये केलेल्या करारनाम्याची अंमलबजावणी अद्यापही केलेली नाही. देवस्थानकडून कायद्याला फाटा दिला जात आहे. हे फार गंभीर आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी बेमुदत संपाची नोटीस काढली आहे. यानंतर देखील देवस्थानकडून विश्वस्त आणि अधिकारी कामगारांसोबत मुद्द्यांवर बोलायला तयार नाहीत. या संपकाळात मध्यस्थी म्हणून जिल्हाधिकारी यांनी भूमिका निभवावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Shanaishwar Devasthan
Nagar Road traffic problems: पुणेकरांचा नगर रस्त्यावरील प्रवास होणार सुसाट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com