Ajit Pawar Said : नितीन गडकरींमुळे भाजप विदर्भात सर्वदूर पोहोचली !

Vidarbha : दुर्दैवाने विदर्भात आम्हाला तसा प्रतिसाद मिळत नाही.
Ajit Pawar and Nitin Gadkari
Ajit Pawar and Nitin GadkariSarkarnama

Ajit Pawar praised Nitin Gadkari in Nagpur : राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना १९९९ साली झाली. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातून ११ पेक्षा जास्त जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर ज्यांच्यावर विदर्भाची जबाबदारी दिली होती, त्यांना विजयातले सातत्य टिकवता आले नाही. अर्थात त्यासाठी आम्ही त्यांना जबाबदार धरणार नाही, तर आम्हीच त्याची जबाबदारी घेऊ, असे अजित पवार म्हणाले. (we don't hold them responsible, we will take responsibility for it)

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन दिवसीय ओबीसी शिबिरासाठी आज (ता. ३) नागपुरात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. ज्या प्रकारे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र किंवा कोकणात जळगावमध्ये आणि नगरमध्ये सही-सहा जागा, पुणे जिल्ह्यातून १० जागा निवडून आल्या आहेत.

दुर्दैवाने विदर्भात आम्हाला तसा प्रतिसाद मिळत नाही. स्थानिक नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त यश मिळवल्यास विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवण्याबाबत विचार करता येईल. कारण आघाडीत लढताना तशी परिस्थिती सहकारी पक्षांसमोर मांडावी लागते, असे पवार म्हणाले.

शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांच्या निवासस्थानी यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रशांत पवार आदी होते. यावेळी अजित पवार म्हणाले. प्रयत्न केले तर जनता पाठीशी उभी राहू शकते, मागे जाणीवपूर्वक एक प्रयत्न असा झाला की, पक्षाचे प्रमुख लोक जे राज्याची जबाबदारी बघतात, ते लोक विदर्भाकडे दुर्लक्ष करतात, अशा बातम्या पसरवण्यात आला. पण ते खरे नाही.

Ajit Pawar and Nitin Gadkari
Sanjay Raut थुंकले, बघा Ajit Pawar काय म्हणाले ? | Shivsena |NCP|Shrikant Shinde |Sarkarnama Video

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अर्थमंत्री आणि मी जलसंपदा मंत्री असताना मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी आम्ही मनापासून काम केले. त्यातून विविध आरोप झाले, आमच्यावर आरोप करण्यात आले. केसेस लावण्यात आल्या. शेवटी कामं झाली पाहिजे आणि पारदर्शकतेने झाली पाहिजे, हे महत्त्वाचे आहे.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर भुजबळ, मधुकरराव पिचड, पद्मसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर जबाबदारी होती. त्यावेळी आम्ही आणि कॉंग्रेस स्वतंत्र लढले, तर भाजप-सेना एकत्र लढली. नारायण राणेंच्या सरकारने प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी सहा महिने आधी विधानसभेच्या निवडणुका घेतल्या. त्यानंतरच्या निवडणुकीत आम्ही आघाडी केली. त्यावेळी पहिल्यांदा ज्यांच्या जागा निवडून आल्या, त्या बाजूला केल्या दोन नंबर राहिलेल्यांना त्या-त्या जागा सोडण्यात आल्या. अशा पद्धतीने ती निवडणूक लढली गेली.

Ajit Pawar and Nitin Gadkari
Ajit Pawar On AhilyaDevi Nagar: नगरचे ‘अहिल्यादेवी नगर’ करण्याचे स्वागतच; पण दिल्लीतील महाराष्ट्रात सदनातून....’

लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भातील (Vidarbha) बुलढाणा, अमरावती, भंडारा-गोंदिया अशा काहीच जागा आम्ही लढवतो. आता युवकांनी मेहनत घेतली आणि आम्ही लक्ष घातलं तर विदर्भात पुन्हा यश मिळवणे फारसे अवघड नाही. पूर्वी भाजपही (BJP) विदर्भात फारशी नव्हती. पण नितीन गडकरींनी पुढाकार घेतला आणि भाजप विदर्भात सर्वदूर भाजप पोहोचली. त्यामुळे आम्हाला आताही येथे भरपूर वाव आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com