Amravati MLC Election: विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला विश्वासघाताच्या पुनरावृत्ती भीती : अमरावतीत हायकमांडही हतबल

Amravati MLC Election, Congress Crisis, Harshjit Deshmukh: अमरावती विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्याबाबत निर्माण झालेल्या वादामुळे पक्ष अडचणीत आला आहे. पर्यायी उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत कायदेशीर आणि राजकीय पेच निर्माण झाला आहे.
Yashomati Thakur, Harshjeet Deshmukh
Yashomati Thakur, Harshjeet DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Congress News: विधानपरिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख भाजपला मॅनेज झाल्याचे आरोप होत आहेत. ते सध्या रुग्णालयात दाखल आहेत, मात्र त्यांनी प्रचारातून माघार घेतली असल्याचा दावा काँग्रेस पक्षातून केला जात आहे. या नामुष्कीनंतर काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विर्श्वकर्मा यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. पण या पाठिंब्यासाठी दोन प्रमुख अडचणी आहेत.

हर्षजीत देशमुख यांच्या वर्तणुकीने निर्माण झालेल्या पेच प्रसंगातून अन्य उमेदवारास समर्थन देण्यात आता काँग्रेसला कायदेशीर अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. यानंतरही ज्याला समर्थन दिले तोही तसाच वागला तर काय? असाही गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने प्रदेशाध्यक्षांनीच आता मार्गदर्शन करावे, अशी विनंती स्थानिक पातळीवरून करण्यात आली आहे.

Yashomati Thakur, Harshjeet Deshmukh
Harshjit Deshmukh Missing : अमरावती विधान परिषदेत मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार ‘गायब’; 20 कोटींमध्ये निवडणूक मॅनेज झाल्याचा यशोमती ठाकुरांचा खळबळजनक आरोप

शुक्रवारी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची निर्माण झालेल्या पेच प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला पक्ष निरीक्षक ऍड. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप व मनपातील विरोधी पक्षनेते विलास इंगोले उपस्थित होते.

बैठकीनंतर माहिती देताना जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले, हर्षजीत देशमुख येतो म्हणतात. आता निवडणुकीस उणेपुरे पाच दिवस शिल्लक आहेत. दुसऱ्या उमेदवारास समर्थन द्यावे तर, पक्षाचा अधिकृत उमेदवाराने एबी फॉर्म लावला आहे. अशाही स्थितीत दुसऱ्या उमेदवारास समर्थन दिले आणि तो ही हर्षजीत देशमुखांसारखाच वागला, तर काय उत्तर द्यावे, असा पेच उत्पन्न झाला आहे.

Yashomati Thakur, Harshjeet Deshmukh
MLC Election : भाजपशी दोन हात करणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांना तुतारीचे आमदारच साथ देईनात; वसंतराव देशमुखांच्या उमेदवारीला विरोध

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांना येथील सर्व परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी तुम्हाला काय वाटते ते ठरवा, निर्णय घ्या व कळवा एवढाच निरोप दिला आहे. आम्ही अद्याप कोणत्याच निर्णयाप्रत आलेलो नाही. प्रदेशाध्यक्षांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा असल्याचेही बबलू देशमुख यांनी स्पष्ट केले.

इकडे आड, तिकडे विहीर

एकंदरीत काँग्रेससमोर समर्थन देताना कायदेशीर अडचण आहे. त्यामुळे सध्यातरी काँग्रेसला मार्ग सापडू शकलेला नाही अशी स्थिती असून हर्षजीत देशमुख यांनी म्हटल्याप्रमाणे परत आल्यास प्रचार कसा करायचा असाही पेच आहे. इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती या निवडणुकीत काँग्रेसची झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com