Bhandara Gondia Lok Sabha: पटोलेंच्या बालेकिल्ल्यात आंबेडकरांची तोफ धडाडणार

Prakash Ambedkar: सध्या वंचितकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: प्रकाश आंबेडकर मैदानात उतरल्याचं दिसत आहे. अशातच नाना पटोले यांना आव्हान देण्यासाठी वंचितने थेट पटोलेंच्या बालेकिल्ल्यात सभेचं आयोजन केलं आहे.
Nana Patole, Prakash Ambedkar
Nana Patole, Prakash AmbedkarSarkarnama

Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडी आणि वंचितची (MVA&VBA) युती होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवस सुरु होत्या. पंरतु शेवटी युतीची बोलणी फिसकटली आणि वंचितने स्वतंत्र लोकसभा निवडणूका (Lok Sabha Election) लढण्याचा निर्धार केला. वंचितच्या या निर्णयामुळे आघाडीच्या मतांमध्ये विभाजन होणार असल्याचं बोललं जात आहे.

प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) संविधानाच्या रक्षणासाठी आमच्याशी युती करावी असं आघाडीतील नेते म्हणत होते. मात्र, आघाडीत आम्हाला सन्मानजनक जागा देत नसल्याचा आरोप करत प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर पडले. आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आंबेडकरांचा रोष हा काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर असल्याचं दिसून आलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या वंचितकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: प्रकाश आंबेडकर मैदानात उतरल्याचं दिसत आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान देण्यासाठी वंचितने थेट पटोलेंच्या गृह जिल्ह्यात मोठ्या सभेचं आयोजन केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भंडारा-गोंदिया लोकसभा (Bhandara-Gondia Lok Sabha) क्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय केवट यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची उद्या 12 एप्रिलला भंडारा-गोंदिया येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीला मानणारे लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर नाना पटोले यांच्या गृह जिल्हात त्यांना आव्हान देण्यासाठीच वंचितची सभा असल्याचंही बोललं जात आहे.

Nana Patole, Prakash Ambedkar
Narendra Modi Speech : 'काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण संपवलं', नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

प्रकाश आंबेडकर यांची जाहीर ही सभा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्हात होणार असल्याने या सभेवर राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. आंबेडकर या जाहीर सभेमध्ये काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता आंबेडकर या सभेतून पटोलेंवर निशाणा साधणार का युतीला लक्ष करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तर भंडारा-गोंदिया लोकसभेत भाजपने पुन्हा एकदा सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून डॉ.प्रशांत पडोळे (Dr. Prashant Padole) मैदानात आहेत आणि वंचितवे संजय केवट यांना उमेदवारी दिल्यामुळे या मतदारसंघात चांगली चुरस निर्माण झाली आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com