Budget Session : राम कदम, विजय वडेट्टीवार विधानसभेत भिडले

Maharashtra Assembly : मनोज जरांगे पाटलांच्या आरोपांवरून नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक
Ram Kadam & Vijay Wadettiwar
Ram Kadam & Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Budget Session : मराठा आरक्षण विषयावरून सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता विधानसभेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशात गुरुवारी (ता. 29) विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार राम कदम यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. भाजपा आमदार राम कदम यांनी योगेश सावंत नावाच्या व्यक्तीने केलेले वक्तव्य आणि त्याच्या अटकेनंतर सुटकेसाठी आमदार रोहित पवार यांनी फोन केला, असा दावा केला. कदम यांच्या या दाव्यानंतर विधानसभेतील वातावरण चांगलेच तापले. भाजपा आमदार राम कदम यांनी विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व शरद पवार यांचे नाव घेत गंभीर आरोप केले.

आमदार कदम यांनी आरोप केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. राम कदम यांनी योगेश सावंत नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला. कदम म्हणाले, मुंबईतील सांताक्रुज पोलिस ठाण्यात 27 फेब्रुवारीला अजय पनवेलकर यांनी तक्रार दाखल केली आहे. एका व्हायरल क्लिपमध्ये राज्यात जातीवाद पसरवण्याचे षडयंत्र रचण्यात येत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओत एक इसम म्हणतो की ‘देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. देवेंद्र फडणवीससारखे तीन मिनिटांत महाराष्ट्रातले आख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू.’ हे वक्तव्य करणाऱ्याचे नाव योगेश सावंत आहे. सावंतचा संबंध बारामतीत असल्याचे कदम म्हणाले. आमदार रोहित पवार यांनी फोन करून पोलिसांना सावंतला सोडायला सांगितले, असा आरोप कदम यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Kadam & Vijay Wadettiwar
राज्याला खड्ड्यात घालणारा अर्थसंकल्प, वडेट्टीवारांनी अजितदादांना सुनावले | Vijay Wadettiwar |

कदम यांनी हा मुद्दा उपस्थित करताच विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले. कोणतीही सूचना न देता सभागृहात रोहित पवार व शरद पवारांचे नाव घेतले गेले, असा आक्षेप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला. सभागृहात कुणाचेही नाव घेताना नोटीस देण्यात आली होती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असेच एखाद्या नेत्याचे नाव कसं घेता येईल? नावे घेतली असतील तर ती कामकाजातून काढून टाका”, अशी मागणी त्यांनी केली.

एकीकडे राम कदम विरुद्ध विजय वडेट्टीवार असा कलगीतुरा चालू असताना आशिष शेलार यांनी विरोधकांवर आगपाखड केली. ‘एक समाज तीन मिनिटांत संपवू, देवेंद्र फडणवीस तुला संपवू’ असे म्हटले गेले. युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली. त्यात योगेश सावंत सापडला. सावंत स्वत: म्हणतोय की तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा पदाधिकारी आहे. रोहित पवारांनी स्वत: पोलिस निरीक्षकाला फोन केला. काय संबंध? योगेश सावंतचाही पत्ता बारामती मतदारसंघातला आहे. आता योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा संबंध काय? रोहित पवारांनी फोन केला होता का? त्याचे कारण काय?” असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले.

Edited By : Prasannaa Jakate

Ram Kadam & Vijay Wadettiwar
जरांगेंचा उद्रेक, भर सभागृहात वड्डेवारांनी कुणाला धरलं जबाबदार ? | Vijay Wadettiwar | Jarange Patil|

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com