डबल एमए, तीन भाषांवर प्रभुत्व, घरची सधन; तरीही करायची चोऱ्या...

घरून मिळालेल्या पैशांवर मौज करता येत नव्हती. त्यामुळं तिने चोरीचा (Theft) मार्ग पत्करला. काही महिलांबरोबर तिने चोरीला सुरुवात केली. काही दिवस सर्व सुरळीत सुरू होते.
Crime, Theft

Crime, Theft

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या पर्स चोरीचे (Theft) प्रमाण वाढले होते. पोलिस ठाण्यात (Police Station) तक्रारींची पाऊस पडत होता. पण चोरट्याचा काही केल्या पत्ता लागत नव्हता. पोलिसही त्रस्त झाले होते. पण चोर सापडल्यावर पोलिसांचेही डोके चक्रावून गेले. कारण चोर २७ वर्षीय उच्चशिक्षित तरुणी आहे. ती दोन विषयांत एम.ए. झालेली आहे, तीन भाषांवर प्रभुत्व आहे आणि घरची सधन आहे. तरीही ती चोऱ्या करायची. का करायची, कशासाठी करायची, हे वाचल्यावर कुणालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

नागपूर (Nagpur) पोलिसांनी उच्चशिक्षित चोरट्या तरुणीला अटक केली आहे. या तरुणीनं आठ वर्षांपूर्वी सुरू चोरीचा प्रवास सुरू केला. ही युवती हॉस्टेलवर राहायची. मात्र, घरून मिळालेल्या पैशांवर मौज करता येत नव्हती. त्यामुळं तिने चोरीचा मार्ग पत्करला. काही महिलांबरोबर तिने चोरीला सुरुवात केली. काही दिवस सर्व सुरळीत सुरू होते. पण नंतर नंतर हिस्सेवाटणीवरून वाद निर्माण झाला. त्यानंतर या तरुणीनं स्वतः चोरी करण्याचा धंदा सुरू केला. आत्तापर्यंत तिने वीस ठिकाणी चोऱ्या केल्या. या चोरीच्या रकमेतून तिनं मौजमजा केली.

दागिने लपवून ठेवले. मात्र, दागिने विक्रीसाठी गेल्यावर सोनार आपले बिंग फोडेल, अशी भीती तिला होती. त्यामुळं तिने दागिन्याच्या वस्तू लपवून ठेवल्या होत्या. ही तरुणी आहे सत्तावीस वर्षांची. तिच्या घरची परिस्थिती तशी सधन. दोन विषयांत ती एम.ए. झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं चोऱ्या करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या चोरीची तिला सवयच झाली. गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि महिलांच्या पर्समधून रोख रक्कम लंपास करणे एवढंच तिचं काम. अशाच प्रकारचे गुन्हे घडत असल्यानं पोलीस त्रस्त झाले होते. अखेर तिला पकडण्यात यश आलं. आत्तापर्यंत तिनं वीस चोऱ्यांची कबुली दिली आहे.

साहाब, आप नही समझोगे...

उच्चशिक्षित असूनही चोरी का करते हे विचारल्यावर 'आप नही समझोगे' असं गंभीर उत्तर तिनं पोलिसांना दिलं. त्यामुळं उच्चशिक्षित आणि सधन घरची असून चोरी करण्यामागे नेमकं कारण काय, हे पोलिसांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, केवळ मौजमजा करण्यासाठी ती चोऱ्या करायची, असे निष्पन्न झाले. तिच्यावर सिताबर्डी पोलिस ठाण्यात ७, गिट्टीखदान ठाण्यात १, तहसील पोलिस ठाण्यात १३, असे २१ चोरीचे गुन्हे दाखल आहेत. रोख रक्कम ती खर्च करायची, तर दागिने लपवून ठेवायची. तहसील पोलिसांनी १६ लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

- किशोर शिर्के, साहाय्यक पोलीस निरीक्षक, बर्डी पोलीस स्टेशन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com