Sarkarnama Impact : ऐकलं का लोक हो, ‘विक्रमादित्य’ गोंडपिपरीला मिळालं जे हवं ते...

Mismanagement : चार वर्षांत दहा तहसलीदार पाहणाऱ्या तालुक्याला नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती
gondpipri office
gondpipri officesarkarnama

Chandrapur News : एखाद्या शासकीय यंत्रणेत किती उदासीनता नसावी, याचं उत्तम उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका. चार वर्षांत तब्बल दहा तहसीलदार बदलून गेलेल्या या तालुक्याला महसूल विभागात बदल्यांचा रेकॉर्ड करणारा ‘विक्रमादित्य’ पद म्हणूनच ओळख पडली होती. अखेर आता या तालुक्याला नियमित तहसीलदार मिळाले आहेत. ‘सरकारनामा’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर. नियमित तहसीलदार मिळाल्यानं तालुक्यातील लोकं आता एकमेकांना आनंदानं सांगत आहेत, ‘ऐकलं का.. शेवटी गोंडपिपरीला मिळालं बरं जे हवं होतं ते...’ (Finally appointment of full time tehsildar at Gondpipari in Chandrapur district)

नियमित तहसीलदारच नसल्यानं गोंडपिपरी तहसीलमध्ये येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय होत होती. कधी साहेब सुटीवर असायचे, कधी दौऱ्यावर तर कधी ते तर केव्हाच बदलून गेले, अशी उत्तरं लोकांना मिळायची. महसूल विभागातही गोंडपिपरीत एकही तहसीलदार का टिकत नाही, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. तालुक्याला नियमित तहसीलदार द्या, अशी नागरिकांची मागणी होती.

महसूल विभागाच्या कामांसोबतच तहसीलदाराचं पद हे तालुका दंडाधिकाऱ्याचंही असतं. त्यामुळे पोलिसांच्या मदतीनं तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणं, काही फौजदारी प्रकरणांची सुनावणी घेण्याचं कामही तहसीलदाराला करावी लागतात. मात्र, चार वर्षांत तब्बल दहा तहसीलदार होऊन गेल्यानं गोंडपिपरीतील कामकाजाच्या फाइल्स किती तुंबल्या असतील, याचा विचारच न केलेला बरा.

‘सरकारनामा’ने हा विषय लाऊन धरला. लोकांची कशी गैरसोय होतेय ही बाब शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर चंद्रपुरातील सुस्त महसूल यंत्रणा कामाला लागली. आता शुभम बहाकर यांना गोंडपिपरीच्या तहसीलदारपदी पूर्णवेळ अधिकारी म्हणून रुजू होण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही ‘मिळाला बुवा एकदाचा नियमित साहेब..’ असा सुटकेचा श्वास घेतलाय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोंडपिपरी हा महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि तेंलगणाच्या सीमेवर असलेला आदिवासीबहुल तालुका. राजुरा विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या गोंडपिपरी तालुक्याचं प्रतिनिधित्व आमदार सुभाष धोटे करतात. तालुक्यावर असलेला अनेक वर्षांपासूनचा मागासलेपणाचा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही. कुठलाच मोठा उद्योग नसल्यानं तालुक्यातील लोकांचा शेतीवरच अवलंबून राहावे लागतं. नागरिकांची बहुतांश कामे शेतीसंदर्भातच असतात. त्यामुळे त्यांना तहसील कार्यालयात येणे-जाणे करावेच लागते. पण दरवेळी कार्यालयात गेल्यावर नवीन साहेब रुजू झाल्याची माहिती लोकांना मिळायची. आता शुभम बहाकर हे या तालुक्यातील पूर्णवेळ अधिकारी म्हणून कामाचा सर्व ‘बॅकलॉग’ भरून काढतील व लोकांची नाराजी दूर करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

(Edited by : Prasannaa Jakate)

gondpipri office
Chandrapur Bank : कोर्टाच्या आदेशाने सर्वांचा जीव वरतीखालती, मेसेजने सांगितले पुढे ढकला भरती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com