'एक फुल दोन हाप' म्हणत संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Sanjay Raut News : 'राज्यातील बेकायदेशीर सरकार एक दिवस जाणार...'
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut News : ''राज्यात बेकायदेशीर सरकार सत्तेत बसलंय, पण हे सरकार एक दिवस जाईल. हे सरकार बेकायदेशीर आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकरला ललकारलं आहे.

'एक फुल दोन हाप' असं म्हणत शिंदे गटात गेलेल्या बुलडाण्यातील खासदार आणि आमदारांवर संजय राऊतांनी हल्लाबोल केला. ते बुलडाण्यातील भव्य शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते.

राऊत म्हणाले, ''शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी १०० दिवस काय जन्मठेप भोगायला देखील तयार आहे, महाराष्ट्राचा इतिहास हा लढवय्या आहे, त्यामुळे हे ४० रेडे महाराष्ट्रामध्ये येतील तेव्हा त्यांना जाब विचारा. शिवसेनेचे चिन्ह काय आहे मशाल. आमची मशाल गद्दारांचे खोके साफ केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत राऊतांनी घणाघाती टीका केली.

Sanjay Raut
Abdul Sattar : गुवाहाटी दौऱ्याकडे पाठ फिरवणारे सत्तार नाराज ? ; सत्तार म्हणाले..

''सगळ्यात जास्त खोके हे बुलडाण्यात आले आहेत. त्यामुळे हे खोक्यावाले पुन्हा निवडून जाणार नाही याची शपथ आपण घेतली पाहिजे. हेच खोकेवाले आज गुवाहाटीला गेलेत. पण महाराष्ट्रातील देव काय संपले आहेत का?, राज्यातील बेकायदेशीर सरकार सत्तेत बसलंय, पण हे सरकार एक दिवस जाईल. महाराष्ट्राचा इतिहास हा लढवय्या आहे, त्यामुळे हे ४० रेडे महाराष्ट्रामध्ये येतील तेव्हा त्यांना जाब विचारा'', असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Kolhapur News : आधी पद नंतर प्रवेश; कोल्हापुरातील बड्या नेत्याची मुख्यमंत्री शिंदेंसमोर अट!

''सर्वात मोठे देव आणि मंदिर हे बुलडाण्यात आहे. पण खोक्यावाले रेडे गुवाहाटीला गेले आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. ज्या पक्षाने देशाला नेतृत्व दिलं त्यासाठी मी कुरबान व्हायला देखील तयार आहे. मी तुरूगांत गेलो तरी भगवा माझ्या सोबत होता, आणि या पुढे राहिल. शिवसेनेचा मुख्यमंत्री करून या रेड्याचा बळी आपण दिला पाहिजे'', असं संजय राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com