भाजपमध्ये बळीराम शिरस्कर इन आणि फलकावरून आमदार रणजित पाटील आऊट !

या प्रवेश सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज अकोला शहरात दाखल झाले होते. त्यांच्याही लक्षात ही बाब आली.
Chandrashekhar Bawankule at Akola
Chandrashekhar Bawankule at AkolaSarkarnama

अकोला : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार बळीराम सिरस्कार यांचा आज अकोल्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. एक मोठा सोहळा पार पडला. प्रवेश सोहळ्याचे आणि स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फलक झळकले खरे, परंतु या फलकावरून माजी मंत्र्याची छायाचित्रे हद्दपार करण्यात आली. माजी गृहराज्यमंत्री आणि व विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांचा फोटो या फलकावरून डावलण्यात आला आहे.

या प्रवेश सोहळ्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज अकोला (Akola) शहरात दाखल झाले होते. त्यांच्याही लक्षात ही बाब आली. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी वेळेवरची परिस्थिती योग्यरीत्या हाताळली. राष्ट्रवादीचे (NCP) नेते बळीराम सिरस्कार यांनी आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजपमध्ये (BJP) जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यासमवेत १२० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. या दरम्यान, त्यांच्या पक्षप्रवेश आणि स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

अकोला शहरातील डॉ. सुशिलाबाई देशमुख महाविद्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मात्र या फलकावर राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांना स्थान देण्यात आले नाही. दरम्यान, प्रवेश सोहळ्याच्या कार्मक्रमात मंचावर असलेल्या फलकावरही त्यांना डावलले आहे. या फलकात आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय कुटे, आमदार आकाश पुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाखळे यांच्यासह अकोला महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, माजी महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी महापौर अर्चना म्हैसने यांना स्थान मिळालं. मात्र आमदार असलेले रणजीत पाटील यांना डावलण्यात आल्याने पुन्हा भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

Chandrashekhar Bawankule at Akola
बावनकुळे, खोपडे यांना मी मंत्रालयातील किडे म्हणायचो : फडणवीस

https://www.youtube.com/watch?v=qntNJJYzwUQ

भारतीय जनता पक्षात गटबाजी नाही, आमच्याकडे वरिष्ठांचा आदेश हा प्रमाण आहे. असे वरिष्ठ नेते सांगत असले तरी अशा घटनांमधून पक्षातील गटबाजी उघड होते. भाजप हा कडक शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. येथे असे प्रकार अपेक्षित नाहीत. श्रेष्ठी नेत्यांना काय समज देतील, हे लवकरच कळणार आहे. पण आज भाजपमधील गटबाजीची चर्चा जिल्हाभर झाली. नव्यानेच प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेले आमदार चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणात काय तोडगा काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com