Nana Patole : मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पटोलेंचा देशमुखांना टोला...

Congress President : पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद झेपत नाहीये. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करावे.
Ashish Deshmukh and Nana Patole
Ashish Deshmukh and Nana PatoleSarkarnama

Nana Patole criticizes Ashish Deshmukh : कॉंग्रेसचे (Congress) नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्याकडे केली आहे. पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद झेपत नाहीये. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करावे, असे डॉ. देशमुख यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना सांगितले आहे. तसे पत्रही त्यांनी दिले आहे.

काल डॉ. देशमुखांनी (Ashish Deshmukh) नाना पटोलेंची तक्रार केली. याबाबत नाना पटोलेंना (Nana Patole) विचारणा केली असता, मी संस्थानिक नाही आणी मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असा टोला त्यांनी देशमुखांना लगावला. पक्षात जे काही सुरू आहे, त्यात काही अंतर्गत बाबी आहेत. त्यामुळे जे बोलायचे आहे, ते माध्यमांसमोर बोलायची गरज नाही.

निवडणुकीच्या स्थितीत काही स्थिती उद्भवली असेलही, तर पक्ष पातळीवर त्यावर निर्णय घेतला जाईल. कुणी परस्पर काहीही बोलत असेल, घोषणा करीत असेल, तर त्याला काही अर्थ नाही, असे ते म्हणाले. इकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार सुनील केदार यांनी वडेट्टीवारांच्या घरी बैठक घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला.

नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कुणी ऐकत नाही, हा संदेश गेला. तिकडे भाजपमधून निष्कासीत करण्यात आलेले माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासोबत मिळून पटोलेंनी भंडारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन केली. तेथे उपाध्यक्षांसह तीन जिल्हा परिषद सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकलेली आहे. त्यामुळे तेथे सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहे.

Ashish Deshmukh and Nana Patole
Ashish Deshmukh: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीवर डाॅ. आशिष देशमुख यांचा आक्षेप

भंडाऱ्यात जी स्थिती उत्पन्न झाली, त्यामुळे नाना पटोलेंची जिल्ह्यावरही पकड नाही, असे बोलले जाऊ लागले आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसच्या विदर्भातील काही नेत्यांकडून त्यांना टारगेट केले जात आहे. त्यामुळे नाना दुहेरी-तिहेरी टेंशनमध्ये आले आहेत. या परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत असताना डॉ. आशिष देशमुख त्यांना टारगेट करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. डॉ. आशिष देशमुख राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांचे चिरंजीव आहेत.

नागपुरात लता मंगेशकर रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे देशमुखांनी विणले आहे. डॉ. आशिष देशमुख आज मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मी संस्थानिक नाही आणि मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, असा टोला नना पटोले यांनी डॉ. आशिष देशमुख यांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com