आमदार मते संतापले; म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्याला हे शोभत नाही...

गृहमंत्र्यांनी Home Minister Dilip Walse Patil राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोहळा जवळपास आटोपून घेतला होता. त्यामुळे संतप्त झालेले आमदार मते MLA Mohan Mate तेथून तडक बाहेर पडले व निघून आले.
MLA Mohan Mate and Home Minister Dilip Walse Patil
MLA Mohan Mate and Home Minister Dilip Walse PatilSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे वनामती सभागृहात झाले. या उद्घाटन कार्यक्रमात ठरवून माझा अपमान करण्यात आल्याचा आरोप दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी केला. त्यामुळे संतापून वनामतीतून ते तडक बाहेर पडले आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना हे शोभत नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला.

नवीन पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या वनामती सभागृहात होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ठाणेदार सार्थक नेहाते यांनी आमदार मोहन मते यांना निमंत्रण दिले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दुपारी ३.१५ वाजता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार ३.१० वाजता आमदार मते वनामती सभागृहात पोहोचले. पण तोपर्यंत उद्घाटनाचा सोहळा सुरू झाला होता. गृहमंत्र्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोहळा जवळपास आटोपून घेतला होता. त्यामुळे संतप्त झालेले आमदार मते तेथून तडक बाहेर पडले व निघून आले.

हुडकेश्‍वर पोलिस ठाणे केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आहे का, गृहमंत्री हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे की महाराष्ट्राचे, असे प्रश्‍न करीत केवळ माझा अपमान करण्यासाठीच कट रचून दिलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी उद्घाटनाचा सोहळा आटोपण्यात आल्याचा आरोप आमदार मते यांनी कला. कोणताही उमेदवार निवडणूक लढत असताना एका पक्षाचा असतो निवडून आल्यानंतर तो तमाम जनतेचा प्रतिनिधी असतो. याचा विसर राज्याचे गृहमंत्री असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांना पडलेला दिसतोय, असे आमदार मते ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

आमदार मोहन मते को घुस्सा क्यो आता है?

आमदार मोहन मते हे आक्रमक नेते आहेत. चुकीच्या गोष्टी ते खपवून घेत नाहीत. तसे कुणी केल्यास ते लगेच भडकतात. त्यामुळेच की काय त्यांचा एक वेगळा दरारा आहे. ‘आमदार मोहन मते को घुस्सा क्यो आता है’, असा प्रश्‍न नेहमीच विचारला जातो. आजच्या घटनेने नागपूरकरांना त्याचे उत्तर पुन्हा एकदा मिळाले. आज त्यांना जाणूनबुजून उद्घाटन कार्यक्रमापासून वंचित ठेवण्यात आले. ३.१५ वाजताची वेळ दिल्यानंतर ते अगदी वेळेत म्हणजे ३.१० वाजता वनामती सभागृहात ते पोहोचले होते. पण तेथे पोहोचल्यावर परिसराच्या आमदारांना ‘रिसीव्ह’ करायलाही कुणी नव्हते. कार्यक्रम सुरू होता आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच तेवढे हजर होते. त्यामुळे आमदारांना राग येणे स्वाभाविक आहे. सभागृहातून तडक बाहेर पडत त्यांनी ‘घुस्सा’ व्यक्त केला.

MLA Mohan Mate and Home Minister Dilip Walse Patil
दिलीप वळसे-पाटील यांना बळीचा बकरा केले आहे!

पोलिसांनी बजावले कर्तव्य…

हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याचे उद्घाटन वनामती सभागृहात दुपारी ३.१५ वाजता होणार असल्याचे निमंत्रण हुडकेश्‍वर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सार्थक नेहाते यांनी आमदार मते यांना दिले होते. आज झालेल्या प्रकारामध्ये पोलिसांचा काही दोष नाही, त्यांनी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावले. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कट रचून अर्धा तास आधी कार्यक्रम सुरू केला. गृहमंत्र्याला ही गोष्ट शोभणारी नाही, अशी टिका आमदार मोहन मते यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com