MNS Vandalize Amazon Office : मनसेने फोडले ॲमेझॉनचे कार्यालय, विकत होते पाकिस्तानी झेंडे !

Amazon Selling Pakistan Flags In Nagpur: पाकिस्तानचा झेंडा ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असलेला दिसला.
Maharashtra Navnirman Sena
Maharashtra Navnirman SenaSarkarnama

MNS Aggressive in Nagpur: ॲमेझॉन इंडिया लिमिटेड ही कंपनी एक इ-कॉमर्स वेबसाइट आहे. विविध प्रकारच्या वस्तू www.amazon.in या वेबसाइटच्या मार्फत विकते. हे करताना पाकिस्तानचा झेंडा ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असलेला दिसला. ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना खटकली आणि मनसैनिकांनी आज ॲमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली. (Sells Pakistan flags in various sizes and styles)

मनसैनिकांनी यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, ॲमेझॉन इंडिया लिमिटेड ही कंपनी आपल्या वेबसाइट वर जवळपास १०-१५ विविध आकारांत आणि शैलीत पाकिस्तानचे झेंडे विकते. याशिवाय "Deadly Bhagavat Geeta" हे हिंदू विरोधी पुस्तकदेखील ॲमेझॉनवरून विकले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याविरोधात आज (ता. २२) मनसेचे शहर अध्यक्ष चंदू लाडे व विशाल बडगे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

पाकिस्तानचा कुरापतींमुळे भारतीय सैन्यांना वीरमरण येते. पाकिस्तानचा नालायक कृत्यांमुळे देशांतर्गत सामान्य भारतीयांचा जीव जातो. तसेच देशातील काही असामाजिक तत्व हे अधूनमधून देश विरोधी आंदोलनामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवतात. जी एक अत्यंत घृणास्पद बाब आहे. परंतु या असामाजिक व देशविरोधी तत्वांना हे पाकिस्तानचे झेंडे मिळतात कुठून, हे आता स्पष्ट झाले आहे.

ॲमेझॉन इंडिया हे पाकिस्तानचे झेंडे लोकांना घरपोच देऊन देशविरोधी तत्वांना देशाविरुद्ध कार्य करण्यास मदत तर करतच आहे, सोबतच काही देशांतर्गत देशद्रोह्यांना प्रवृत्तदेखील करते आहे. घरपोच पाकिस्तानचे झेंडे विकणे हे निर्विवादास्पदपणे एक देशद्रोहाचे कृत्य आहे ज्यामुळे पुढे जाऊन देशात अराजकता माजू शकते, असे चंदू लाडे म्हणाले.

Maharashtra Navnirman Sena
MNS On Deepali Sayyed: दीपाली सय्यद तुमचा पक्ष कुठचा ? मनसेच्या किशोर शिंदेंचा तासाभरातच पलटवार

पाकिस्तानचे झेंडे आपल्या देशात झळकावल्याने दंगे होऊ शकतात. यापूर्वीही आपल्या देशात पाकिस्तानी झेंडे झळकावण्यात आलेले आहेत. आपल्या भारत देशाच्या विरोधात नारे लावण्यात आलेले आहेत. या सर्वांकरिता फक्त अमेझॉन इंडिया लिमिटेड हीच कंपनी जबाबदार आहे. यापुढेही असेही काही घडल्यास हीच कंपनी जबाबदार असणार आहे.

याशिवाय "Deadly Bhagavat Geeta" नावाचे भगवत गीतेला खराब ठरवणारे पुस्तक विकून अमेझॉन इंडिया लिमिटेड ही कंपनी हिंदू धर्मीयांचा धार्मिक भावनांना दुखविण्याचे काम करीत आहे. तात्काळ पाकिस्तानी (Pakistan) झेंडे तसेच पाकिस्तानी झेंड्यांची प्रतिकृती असलेल्या वस्तू ॲमेझॉनवरून काढून टाकावे आणि तसे पत्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावे द्यावे आणि भारतातील (India) जनतेची माफी मागावी, असेही मनसैनिक म्हणाले.

Maharashtra Navnirman Sena
Raj Thackeray यांनी पुन्हा Ajit Pawar यांना घेरलं | MNS | Sharad Pawar | BJP | Devendra Fadnavis

ॲमेझॉन कंपनीच्या विरोधात जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. उलट यापुढे अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा चंदू लाडे, विशाल बडगे आणि मनसैनिकांनी दिला आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com