खासदार धानोरकर म्हणाले, येत्या निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम करा...

खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) म्हणाले की, दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात या भागात निधी खेचून आणण्यात यश आले आहे. यापुढे देखील या क्षेत्राचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
MP Balu Dhanorkar and others

MP Balu Dhanorkar and others

Sarkarnama

चंद्रपूर : गेल्या पाच वर्षांत भाजप नेते केवळ विकासाचा फुगा फुगवीत आहेत. परंतु महागाईच्या व्यतिरिक्त सामान्य माणसाला त्यांनी काहीच दिले नाही. येत्या काळात होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीत पोंभुर्णा आणि गोंडपिपरी येथे भाजपचा करेक्ट कार्यक्रम करा, असा सल्ला खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

पोंभुर्णा व गोंडपिपरी येथील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना खासदार धानोरकर म्हणाले, गावापासून ते शहरापर्यंत बदल घडवायचा असेल तर काँग्रेसला (Congress) एकहाती सत्ता मिळवावी लागेल. विकास करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार सक्षम आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास होण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे.

येत्या काळात होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीत पोंभुर्णा आणि गोंडपिपरी येथे भाजपचा करेक्ट कार्यक्रम करून काँग्रेसला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, राजूरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे, घनश्याम येनूरकर, कवडू कुंदोजवार, राकेश रत्नावार, उमेश पदमगिरवार, सुरेश चौधरी, चिमुरकर, तुकाराम झाडे, देवेंद्र बाट्टे यांची उपस्थिती होती.

<div class="paragraphs"><p>MP Balu Dhanorkar and others</p></div>
बाळू धानोरकर म्हणाले, आता लढा प्रकल्पग्रस्तांच्या नॉमिनींसाठी...

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले की, दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात या भागात निधी खेचून आणण्यात यश आले आहे. यापुढे देखील या क्षेत्राचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी राजूरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून नागरिकांमध्ये सरकारप्रती आत्मीयता निर्माण करावी जेणेकरून या निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम करता येईल. नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचार सभांचा धुरळा उडवला जात आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सभांवर सभा सुरू आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com