राष्ट्रवादीचा पटोलेंवर पलटवार; सत्तेचा माज चढला असेल तर बाहेर पडा!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मर्यादा ठेऊन बोलावे.
Praveen Kunte, Nana Patole
Praveen Kunte, Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

नागपूर : महाविकास आघाडी सरकार म्हणून जरी एकत्र काम करत असले तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमधील कुरबूरी वरचेवर दिसून येतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील एकमेव दुकानही बंद होईल, असे म्हणते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याच मित्रपक्षाला डिवचले होते. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार उत्तर दिले आहे.

या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटे यांनी पटोलेंवर हल्ला चढविला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मर्यादा ठेऊन बोलावे. जर सत्तेचा माज चढला असेल तर सत्तेच्या बाहेर पडण्याचे आवाहन राष्ट्रवादीने पटोलेंना दिले. नाना पटोले यांनी विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमात्र दुकान बंद पडेल असे वक्तव्य अतिशय दुर्दैवी असून त्यांनी त्यांच्या आवाक्याबाहेर वक्तव्य करु नये, असा सल्ला देखील दिला.

Praveen Kunte, Nana Patole
नरेंद्र मोदींनी भांडवलदारांना रेड कार्पेट टाकून जनतेला उध्वस्त करणारी धोरणे अवलंबिली!

जलसंपदा मंत्री जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही. साकोली विधानसभा मतदारसंघात त्यांचा झालेला निसटता विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच झाला हे त्यांनी विसरु नये, असेही कुंटे म्हणाले. आज राज्यात महाविकासआघाडी सरकारचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. पटोलेंमध्ये धमक असेल तर सत्तेच्या बाहेर पडून दाखवावे. शक्य नसेल तर बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी कुंटे यांनी केली. अजित पवार व जयंत पाटील लोकनेते असून वारंवार पक्ष बद्दलविणाऱ्या नाना भाऊंनी भाजपची सुपारी घेतल्या सारखे बोलू नये, अशी टीका कुंटे यांनी केली.

Praveen Kunte, Nana Patole
विक्रम गोखले म्हणजे भूखंड विक्रीत फसवणूकीच्या गुन्हामुळे अडचणीत सापडलेला माणूस

नाना पटोले म्हणाले होते, राष्ट्रवादीचे सगळे महान नेते असून पंढरपूरमध्ये हरले. आज राष्ट्रवादीचे तिकीट घेवून त्यांचे पश्चिम महाराष्ट्रातील दुकान बंद होत असेल तर बुलडाण्यातील दुकान बंद व्हायला वेळ लागतो किती. एकच तर दुकान आहे बुलडाण्यामध्ये, ते विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com