PM Modi - Amit Shah News: अमित शहांना खोटं ठरवणारी ‘ही’ महिला आता मोदींनाही...

Kalawati Bandurkar : राहुल गांधी यांचा प्रचार करणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
Narendra Modi, Amit Shah and Kalawati Bandurkar
Narendra Modi, Amit Shah and Kalawati BandurkarSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Political News : लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ आणि त्यानंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या विदर्भातील यवतमाळ जिल्हा चांगलाच प्रकाशझोतात आला. सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांनी पोळून निघालेल्या यवतमाळ जिल्ह्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे लक्ष वेधले. (It has been rumored that Rahul Gandhi will campaign)

निवडणुकींनंतर हा जिल्हा पुन्हा चर्चेत आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एका शेतकरी महिलेबद्दल केलेल्या विधानामुळे. आता याच महिलेने निवडणूक काळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रचार करणार असल्याचे सूतोवाच केले आहे. या महिलेचे नाव आहे कलावती बांदुरकर.

यवतमाळ (Yavatmal) भेटीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कलावती यांची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने (Congress) कलावती यांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलावती यांचा नामोल्लेख करीत केंद्र सरकारने त्यांना सर्व सुविधा पुरविल्या असे नमूद केले होते.

शहा यांचे हे वक्तव्य धादांत खोटे आहे. आपल्याला राहुल गांधी व काँग्रेसने सर्व सुविधा पुरविल्या, असा खुलासा त्यानंतर लगेचच कलावती यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता याच कलावती बांदुरकर यांनी आपण नरेंद्र मोदी खोटारडे असल्याचे जगापुढे आणणार असल्याचे जाहीर केले आहे.

माजी महिला व बालविकासमंत्री आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्या जनसंवाद यात्रेत सहभागादरम्यान कलावती यांनी आपली भूमिका जाहीर केली. आपल्या कुटुंबाला सरकारने नव्हे, तर राहुल गांधी यांनी आधार दिला. काँग्रेसने घर दिले. मुलांचं शिक्षण करून दिलं. त्यामुळे आगामी काळात आपण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रचाराचे काम करणार असल्याचे कलावती म्हणाल्या.

मोदी सरकारने आपल्यासाठी काहीच केलेलं नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान केला. जनसंवाद यात्रेत सहभागी झालेल्या कलावती यांना पुढे करीत काँग्रेसने मोदी सरकार कसे खोटारडे आहे, याचा प्रचार केला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस देशातील नागरिकांच्या हितासाठी लढत आहे.

Narendra Modi, Amit Shah and Kalawati Bandurkar
'अमित शाह खोटं बोलले,मले सगळं राहुल गांधींनी दिलं' | Kalawati On Amit Shah | Sarkarnama | #shorts

पंडित नेहरू, इंदिरा गांधींपासून तर राजीव गांधी यांच्यापर्यंत काँग्रेसने देशासाठी दिलेल्या बलिदानाचा पाढा काँग्रेस नेत्या अॅड. ठाकूर यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान वाचला. शेतकरी, शेतमजूर, गरीब, शोषित, दलित यांचा विकास साधायचा असेल, तर लोकांनी राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे राहावे. मोदी आणि त्यांचे सरकार केवळ धनाढ्य लोकांच्या पाठीशी उभे राहणारे आहे, याकडेही काँग्रेसने जनसंवाद यात्रेतून लोकांचे लक्ष वेधले.

Edited By : Atul Mehere

Narendra Modi, Amit Shah and Kalawati Bandurkar
Kalawati Bandurkar ; ' मला घर , वीज सगळं Rahul Gandhi नी दिलं' | Amit Shah | Sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com