भाजपने हकालपट्टी केलेल्या नगराध्यक्षांचे आमदारांवर गंभीर आरोप

आघाडी सरकारचे नेते पालिकेला निधी कसा देतात?
Priya Bondre
Priya Bondresarkarnama

चिखली (जि. बुलडाणा) : चिखली येथील नगरपरिषदेच्या (Municipal Council) नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे व त्यांचे पती कुणाल यांची (ता.२०) भाजपमधून (BJP) हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावर आज प्रिया बोंद्रे यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवरच विविध आरोप केले. तसेच स्थानिक आमदारांवरही आरोप केले, मात्र त्यांनी आमदारांच्या नावाचा उल्लेख टाळला. त्याच बरोबर भाजपला आरोप सिद्ध करण्याचे आव्हान देखील दिले.

या वेळी बोंद्रे म्हणाल्या की, मला व माझे पती कुणाल यांनी गैरकारभारासह विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे तसेच दादागिरी केल्याच्या कारणावरून भाजपातून हकालपट्टी केल्याची घोषणा भाजपचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी केली होती. यासंदर्भात शहरात केलेल्या विविध विकासकामांची यादी देत माझ्यासह माझे पती कुणाल बोंद्रे यांच्यावर विनाकारण तथ्यहीन आरोप करण्यात आले. त्या सर्व आरोपांचे मी पूर्णपणे खंडन करीत असून पालिकेच्या कार्यकाळात नगराध्यक्ष म्हणून मी केलेल्या विविध विकासकामांबाबत भाजपने केलेले सर्व बिनबुडाचे आरोप सिद्ध करूनच दाखवावे, असे आवाहन भाजपला दिले. भविष्यात याप्रकारचे कुठल्याही प्रकारचे तथ्यहीन आरोप झाल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा देखील प्रिया बोंद्रे यांनी भाजपला दिला.

Priya Bondre
वाळू व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून; प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही ठार

भाजपची सत्ता असतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्व. भाऊसाहेब फुंडकर, माजी मंत्री संजय कुटे यांच्या माध्यमातून प्रचंड विकास निधी खेचून आणल्यामुळे शहरात झालेल्या विकासकामांच्या जोरावर विद्यमान आमदारासह पदाधिकाऱ्यांना माझ्या कार्याचा फायदाच झाला. या कामांच्या जोरावरच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतेदेखील मागण्यात आली. या वेळी शहर व ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विविध कामांची उद्‌घाटन व भूमीपुजने करण्यात येवून अनेक आश्वासनांची खैरात वाटत तत्कालीन जि. प. सभापतींनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सपशेल फोल ठरली. आमदार त्यांच्या आमदार निधीव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा निधी खेचून आणण्यामध्ये अपयशी ठरल्याने तसेच माझी वाढणारी लोकप्रियता सहन न झाल्यामुळे नैराश्येपोटी आमदारांनी पदाधिकाऱ्यांमार्फत आरोप करीत पक्षातून माझी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

आघाडी सरकारचे नेते पालिकेला निधी कसा देतात? या भावनेतून आमच्याप्रती तीव्र विरोध वाढत गेला व मी व माझ्यावर पतीवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहे. या सर्वांना मी आवाहन देत असून विकासकामांच्या जोरावर शहराच्या विकासाकरिता, न्याय्य मागण्याकरिता जनतेच्या सामोरे जाणार असल्याचे सांगितले. मी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मते मागण्याचा अधिकार आमदारांना उरला नसून त्यांनी स्वत: केलेली कामे चिखली शहरासह मतदारसंघात दाखवावी व नंतरच मते मागण्याचे काम करावे, स्वकर्तृत्वातून लोकहिताची कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचा कुटील डाव याद्वारे माझ्याविरोधात रचण्यात आला असून प्रसिद्धीकरिता हपालेल्यांनी माझ्याविरोधात बदनामीचे षडयंत्र आखल्याचेही त्यांनी यावेळी सांगिले. या वेळी नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, त्यांचे पती कुणाल बोंद्रे, यांच्यासह काशीनाथ बोंद्रे, जय बोंद्रे, गोपाल देव्हडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Priya Bondre
भन्नाट कल्पना मांडणाऱ्या गडकरींनी वर्धेत आणला समुद्र; कसा, ते त्यांनीच सांगितले...

पालिकेच्या कार्यकाळात झालेली सर्व विकासकामे नियमानुसार तथा इस्टिमेटप्रमाणे झाली. या प्रत्येक कामाची तांत्रिक मान्यता, जिल्हाधिकऱ्यांमार्फत प्रशासकीय मान्यता, ई-निविदा, थर्टपार्टी ऑडिट आदी कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच बिले काढण्यात आल्याचा खुलास बोंद्रे दांम्पत्यांनी केला. आमच्यावर झालेल्या आरोपांपैकी एकही आरोप सिद्ध होवू शकत नसून आरोप करण्याआधी न. प. मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता, पालिका प्रशासनाची चौकशी करण्यात यावी, त्या चौकशीमध्ये दोषी आढळल्यावरच आरोप सिद्ध होतात, असेही यावेळी कुणाल बोंद्रे यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षांसह काराभारात माझा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नव्हता, प्रत्येक सभेपूर्वी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये सहमतने निर्णय घेण्यात येवून सभागृहात मांडण्यात येत होते, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील रस्ता विकासकामांबाबत मौन...

शहरातील चिंच परिसर तथा जुना मेहकर रोडसंदर्भात विचारले असता कुणाल बोंद्रे यांनी चूक मान्य करीत चिंच परिसरातील रस्त्याचे दोनवेळेस काम करूनदेखील हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याची कबुली दिली. शिवाय १६ कोटी रूपयांच्या सिमेंट रस्त्याच्यासंदर्भातील अतिक्रमणासह, या रस्त्याच्या बांधकामादरम्यान काम अडविणाऱ्यांसंदर्भात समाधानकारक उत्तर दिले नाही. पालिका प्रशासनाच्या कारभारात कोणत्याही प्रकारची दादागिरी केली नसून आमदारांनी प्रोटोकॉलप्रमणे नगराध्यक्षांना कुठेही मान दिला नाही. भाजपने हकालपट्टी केल्यामुळे भाजपत राहण्याचा प्रश्नच उद्भवत नसून आजमितीस पुढील परिस्थितीवर लक्ष दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढील प्रवेशाबाबत योग्यवेळी सांगेल, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com