
भंडारा : मागच्या सरकारमध्ये कुणी काय उद्योग करून ठेवले, ते सर्व बाहेर येणार आहेत. आता फक्त १० दिवस थांबा आम्ही श्वेत पत्रिका काढतोय. मग एकेकाला कळे, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.
गोंदिया (Gondia) नगर परिषदेतर्फे आज लोकांना पट्टे वाटण्यात आले याशिवाय भाजपचा (BJP) कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यासाठी विखे पाटील गोंदियात आले होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, (Sunil Mendhe) माजी आमदार गोपाल अग्रवाल व इतर पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते दुःखी आत्मे आहेत. त्यामुळे ते बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत. उद्योगमंत्र्यांनी आधीच कळविले आहे की राज्य सरकार (State Government) श्वेत पत्रिका काढतेय. आता येत्या १० दिवसांत श्वेतपत्रिकेचे काम पूर्ण होईल, त्यानंतर कुणी काय कारभार करून ठेवले, ते उघड होणार आहे. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, आदित्य ठाकरे लहान आहे, अजून त्यांना खूप काही शिकायचे आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, असे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप-शिंदे सरकारच्या बसलेल्या कानठळ्या आदित्य ठाकरे उठवणार, असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, मी अंबादास दानवे यांना कोणताही सल्ला देणार नाही. सर्वकाही करूनसुद्धा त्यांचे कोणीही ऐकत नसल्याने दानवे असे वक्तव्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विषयावर छेडले असता, नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. नाना पटोले यांना औषधोपचाराची गरज आहे, असे महसूल मंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासंदर्भात महात्मा गांधी यांची कॉपी करून तत्त्वांचे भांडवल केले, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्यांच्या त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला. नाना पटोले निव्वळ प्रसिद्धीसाठी असे करीत असल्याच्या पलटवारही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.