म्हणे पोलिस कारवाईच्या वेळी वारांगना तळघरात जातात, पोलिस आयुक्तांना हाकला…

वारांगनांना संकटात टाकून त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन लढा देऊ, असे ज्वाला धोटे NCP's Jwala Dhote यांनी सांगितले.
Jwala Dhote in the press conference at press club nagpur.
Jwala Dhote in the press conference at press club nagpur.Sarkarnama

नागपूर : शहरातील गंगा जमुना वस्तीतील वारांगनांच्या जिवावरच पोलिस विभाग उठला आहे की काय, असे आता वाटू लागले आहे. पोलिस आयुक्त सांगतात की, आमच्या कारवाईच्या वेळी वारांगना गंगा जमुनात असलेल्या तळघरात लपतात. अन् नंतर पुन्हा बाहेर निघतात. हास्यास्पद वक्तव्य करणारे पोलिस आयुक्त अमितेष कुमार यांची तात्काळ बदली करा, अशी मागणी वारांगनांच्या विषयावर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे म्हणाल्या.

आज पत्रकार परिषदेत ज्वाला धोटे यांनी पोलिस आयुक्त आणि पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, गेल्या १० महिन्यांत नागपुरात ८० खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. आता आयुक्त काय १०० चा आकडा ओलांडायची वाट बघत आहेत का? राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नागपुरात आले असताना त्यांचे स्वागत दोन खुनांच्या घटनांनी झाले. याबद्दलही पोलिस विभागाला काही वाटते की नाही. १०० खून होऊ देण्याचे पोलिसांचे टार्गेट आहे का, असे प्रश्‍न उपस्थित करून त्यांनी गृहमंत्र्यांवर ताशेरे ओढले. पत्रकार परिषदेला तन्हा नागपुरी, जावेद पठाण, सुनील चोखारे, सरदार कर्नल सिंह आणि चंद्रशेखर अडगुलवार यांच्यासह गंगा जमुनातील काही वारांगना होत्या.

एकटी असल्याचा अभिमान..

वारांगनांच्या अडचणी, दुःख समजावून घेऊन मी त्यांच्या बाजूने उभी राहून लढा देत आहे. यामध्ये नगरसेवक आभा पांडे खोडा बनून उभ्या राहिल्या आहे. या लढ्यामध्ये मी एकटी आहे, हे माहिती आहे. पण त्याची खंत नाही, तर अभिमान आहे. कारण सत्यासाठी एकटेच लढावे लागते, खोट्यासोबत १०० मूर्ख असतात, असे धोटे यांनी सांगितले.

त्यांच्या तेरवीची तारीख ठरवेन..

वारांगनांसाठी लढत असताना माझ्या बारसे करण्याची भाषा आभा पांडे यांनी केली होती. माझे नामकरण तर त्या नाही करू शकणार, पण त्यांच्या तेरवीची तारीख मात्र मी ठरवेन. या लढ्यात माझ्या मधात कुणीही आल्यात पूर्वीपेक्षाही आक्रमकपणे त्याचा सामना केला जाईल. शहराच्या मध्यवस्तीतील गंगा जमुनाची जमीन बळकावून ती बिल्डरच्या घशात घालण्याचा भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा डाव आहे. पण वारांगनांना संकटात टाकून त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन लढा देऊ, असे ज्वाला धोटे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनाही ऐकत नाही अमितेशकुमार..

यासंदर्भात गृहमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे. तसेच ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशीही संपर्क केलेला आहे. पालकमंत्रीसुद्धा हतबल झालेले दिसतात. ‘हा पोलिस आयुक्त माझे ऐकत नाही’, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जर पोलिस अधिकारी ऐकत नसेल, तर पालकमंत्र्यांनीसुद्धा पदावर का असावे, असा प्रश्‍न करीत ज्वाला यांनी नितीन राऊत यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे.

बलात्कार पिडितेची तक्रार घेण्यास नकार..

पत्रकार परिषदेत धोटे यांच्यासोबत एक आदिवासी तरूणी होती. तिच्यावर शहरातील प्रसिद्ध सट्टाकिंगने अत्याचार केला होता. पण सीताबर्डी पोलिस तक्रार घेत नसल्याचे पीडित तरूणीचे म्हणणे होते. यावर बोलताना ज्वाला धोटे यांनी या सट्टाकिंगला पोलीस आयुक्तांचा आशिर्वाद असल्याचा आरोप केला. राज्याची उपराजधानी आणि पालकमंत्र्यांच्या शहरात हा प्रकार घडल्याबद्दल धोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून दोषींवर कारवाईची मागणी केली.

Jwala Dhote in the press conference at press club nagpur.
शरद पवारांनी सर्वकाही देऊनही भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी सोडली

दळभद्री तोंडाने पांडेने माझे नाव घेऊ नये..

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंगाजमुना एरिया सील केल्यानंतर तेथील घरांमध्ये अल्पवयीन मुलींना लपविण्याकरीता भुयारी मार्ग, तळघर असल्याचा दावा करण्यात आला होता. जर याठिकाणी भुयारी मार्ग, तळघर सापडले तर नाव बदलून टाकेन, असे धोटे यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी पोलिसांनी भुयारी मार्ग आणि तळघर सापडल्याचे सांगितल्यानंतर नगरसेविका आभा पांडे यांनी ज्वाला धोटे यांनी नाव बदलविण्याचा उच्चार केला. पण ते भुयारी मार्ग आणि तळघर नसल्याचे सांगून धोटे यांनी नगरसेविका आभा पांडे यांनी माझे नाव बदलविण्याची लायकी नसल्याचे म्हटले आणि पांडेंनी त्यांच्या दळभद्री तोंडाने माझे नाव घेऊ नये, असे ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी भाजपाचे चाफले यांचाही खरपूस समाचार घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com