Bawankule on Sharad Pawar : शरद पवारांचे मनपरिवर्तन होईल, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्‍वास !

Ajit Pawar News: अजित पवार हे राज्य आणि देशाच्या विकासासाठी आमच्यासोबत आले आहेत.
Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar and Chandrashekhar BawankuleSarkarnama

Yavatmal-Washim Politics News : एकनाथ शिंदे मर्द मराठा नेता आहेत. त्यांनी हिंदुत्वाची साथ धरली आणि इकडे अजित पवार यांनी देशाच्या कल्याणासाठी, आत्मनिर्भर भारतासाठी मोदींना साथ दिली आहे. पुढच्या काळात शरद पवार आले मन परिवर्तन करतील आणि मोदींना समर्थन देतील, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. (Ajit Pawar supported Modi for the welfare of the country)

बावनकुळे आज (ता. २४) जनसंपर्क अभियानासाठी यवतमाळला आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जे आपले घर सांभाळू शकले नाहीत, त्यांनी आमच्यावर आरोप करण्यात काहीही अर्थ नाही. शेवटी अजित पवार हे राज्य आणि देशाच्या विकासासाठी आमच्यासोबत आले आहेत.

आम्ही त्यांचा पक्ष फोडला, असे म्हणणाऱ्यांनी आधी महाराष्ट्राचा इतिहास तपासून बघावा. पक्ष फोडून सत्ता कुणी मिळवली, हे बघावे आणि नंतरच आरोप करावे. सध्या आमचे घर चलो अभियान सुरू आहे. साडेतीन लाख परिवारांना याअंतर्गत आम्ही फेट देणार आहोत. ज्यांना भेटतोय, ते म्हणत आहेत की नरेंद्र मोदी २०२४ ला पंतप्रधान पाहिजे. ही आज लोकांची भावना आहे, असे बावनकुळे म्हणाले.

सुप्रिया सुळे आमच्यासाठी आदरणीय आहेत. पण त्यांनी हे समजून घ्यावे की, पक्ष फोडण्याचे प्रयत्न आम्ही केले नाहीत. कारण तो आमचा स्वभाव नाही, संस्कारही नाहीत. ज्यांचे असे संस्कार आहेत, ते देशाला माहिती आहेत. त्यांचे संस्कार त्यांना लखलाभ असो. असे म्हणत त्यांनी एक प्रकारे शरद पवार यांच्यावर आरोप केला.

Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule यांनी पुन्हा Uddhav Thackeray'ना डिवचले | BJP | Shivsena UBT |

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत विचारले असता, राहुल नार्वेकर उत्तम वकील आहेत. त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. विधिमंडळामध्ये त्यांना कायदा कळतो. त्यानुसार ते योग्य निर्णय घेतील. त्यामुळे ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असा विश्‍वास आमदार बावनकुळेंनी व्यक्त केला.

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, महापुरुषांच्या बाबतीत कुणीही चुकीची वक्तव्ये करू नये. जेव्हा जेव्हा महापुरुषांचा अपमान होतो, तेव्हा जनमत दुखावले जाते. ते भिडे गुरुजी असो की अजून कोणी, महापुरुषांचा अपमान करू नये.

प्रसाद लाड काय बोलले, हे मला माहिती नाही. पण येवढं मात्र नक्की की, पुढचे वर्ष हे मोदींच (Narendra Modi)असेल आणि अठरापगड जातींच्या विकासाचं असेल. लवकर विश्र्वकर्मा योजना आणली जाणार आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com