Abdul Sattar : गायरान जमीन, कृषी महोत्सवाचं प्रकरण भोवणार? आरोपांबाबत अब्दुल सत्तारांनी सांगितलं...

Abdul Sattar News : अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Abdul sattar News
Abdul sattar News Sarkarnama

Abdul Sattar News : गायरान जमीन घोटळा प्रकरण आणि कृषी महोत्सवासाठी १५ कोटींच्या वसुलीच्या आरोपांवरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. गायरान जमीन घोटळ्याच्या आरोपावरून विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

या सर्व आरोपानंतर अब्दुल सत्तार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून आपल्यावर अधिवेशनादरम्यान सभागृहात आरोप करण्यात आलेत. त्यामुळे आपण यावर उत्तर देखील सभागृहातच देणार असल्याचं त्यांनी काही माध्यमांच्या प्रतिनिधींना म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावरील करण्यात आलेल्या आरोपांवर सत्तार नेमकं काय उत्तर देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Abdul sattar News
सत्तारांचा राजीनामा मागणाऱ्या अजितदादांनाच मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा : ‘विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणांचीही...’

अजित पवारांनी सत्तारांबाबत नेमकं काय मागणी केली?

अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात सिल्लोड कृषी महोत्सवासाठी वसुली मोहीम राबवली जात आहे. असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. कृषी महोत्सवासाठीच्या वसुली मोहिमेसाठी तिकीटे छापण्यात आले. तसेच काही प्रमाणात दरही ठरवण्यात आले.

यामध्ये २५ हजार, साडेसात हजार, दहा हजार, पाच हजार असे दर ठरवण्यात आले असून याबाबत माझ्याकडे पुरावे असल्याचे अजित पवार म्हणाले. तर गायरान जमीन प्रकरण आणि कृषी महोत्सवाच्या वसुली प्रकरणावरून अजित पवारांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Abdul sattar News
BhimShakti - ShivShakti Alliance : भीमशक्ती-शिवशक्ती युती अडली कुठे? सुभाष देसाईंनी दिलं उत्तर

अब्दुल सत्तार यांच्यावर नेमकं कोणते आरोप करण्यात आले?

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत असताना अब्दुल सत्तार हे मंत्री होते. यावेळी त्यांनी वाशिम मधील ३७.१९ एक्कर गायरान जमीनीचा भूखंड अवैधरित्या दिल्याचा आरोप आहे. तसेच अब्दुल सत्तार यांच्याच मतदारसंघात होणाऱ्या कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात वसुली मोहीम राबवली जात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. याच आरोपावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत.

दरम्यान, 'अब्दुल सत्तार राजीनामा द्या', 'अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा', अशा घोषणा महाविकास आघाडीच्यावतीने आज देण्यात आल्या. तर गायरान जमीन आणि कृषी महोत्सव प्रकरणावरून अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत नेमकं काय भूमिका घेतं? हे पाहणं महत्वाच असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com