११ मजल्यांची असेल जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत; फडणवीस निधी वाढवून देणार...

जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी ११ मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे सादरीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासमक्ष करण्यात आले.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी ११ मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे सादरीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासमक्ष करण्यात आले. त्यांनी हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे लवकरच इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) परिसरातच महसूल व इतर संबंधित सर्व विभाग आणण्यासाठी नवीन भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. शहर तहसील, सेतू, खनिकर्म तसेच उत्पादन शुल्क विभाग असलेली जुनी इमारत व संजय गांधी निराधार भवन तोडण्यात येणार आहे. प्रथम तळमजला अधिक सहा (सात माळ्यांची) अशी इमारत तयार करण्याचे प्रस्तावित होते. बांधकाम विभागाने आराखडा तयार केला. मंत्रालयाकडून (Mantralaya) यात त्रुटी काढून तो परत पाठविला होता. नंतर यात सुधारणा करण्यात आली. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर शासनाने (State Government) या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी मेट्रो रेल्वेकडे दिली.

नवीन इमारतीबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार काही बदल करण्यात आले. आता ही इमारत ११ माळ्यांची असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या दोन्ही बाजूंनी दोन इमारती असतील. या इमारतीचा आराखडा व नकाशा नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर करण्यात आला. त्यांनी इमारतीच्या बांधकामाला हिरवा कंदील दाखविला. आता पुढील प्रशासकीय कार्यवाही करून लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Devendra Fadanvis
Fadanvis : सीमा वादावर फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही...

गुणवत्तापूर्ण इमारत तयार करा..

या इमारतीसाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी २०० कोटी देण्याची घोषणा २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इमारतीकडे लक्ष दिले असून, निधी वाढवून देण्यावरही सकारात्मता दर्शविली आहे. नवीन इमारतीवर अडीचशे कोटींचा खर्च येणार असल्याची सूत्रांकडून समजते. इमारतीसाठी निधीची कमी पडणार नाही; परंतु ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण तयार करा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com