मेरी पाऊसपिन्स अकॅडेमीसमोर मृत्यूचा थरार, स्कूल बसने विद्यार्थ्याला चिरडले...

नागपूर (Nagpur) शहरालगत असलेल्या म्हसाळा या गावात मेरी पाऊसपिन्स शाळेसमोर शाळेच्या बसने दिलेल्या धडकेत १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेसमोर हा मृत्यूचा थरार उघड्या डोळ्यांनी बघितला.
Nagpur
NagpurSarkarnama

नागपूर : नागपूर (Nagpur) शहरालगत असलेल्या म्हसाळा या गावात मेरी पाऊसपिन्स शाळेसमोर शाळेच्या बसने दिलेल्या धडकेत (Accident) १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेसमोर हा मृत्यूचा थरार उघड्या डोळ्यांनी बघितला. त्यानंतर काही वेळाने त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी धडकताच विद्यार्थी दहशतीत आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, नित्यनेमाप्रमाणे दुपारी २.३० वाजता शाळा (School) सुटली. या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी स्कूल बस, (School Bus) स्कूल व्हॅनने जाणे येणे करतात. त्यामुळे शाळा सुटल्यावर सर्व विद्यार्थी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येत होते. तेवढ्यात शाळेची बस बाहेर आली आणि एका महिलेला आणि पुरूषाला धडक दिली. त्यानंतर चालकाला काही कळलेच नाही. त्याने सरळ बस दामटणे सुरू केले आणि पुढे असलेल्या एका खासगी स्कूल व्हॅनला धडक दिली. काही दूरपर्यंत ती व्हॅन बसने घासत नेली. दरम्यान रस्त्याच्या बाजूने दोन मुले पायी जात होती. बसने दोघांनाही धडक दिली. त्यांपैकी एक मुलगा बाजुला फेकला गेला आणि दुसरा मुलगा बसच्या खाली आला.

सम्यक दिनेश कदंबे (वय १२) असे मृत विद्यार्थ्याचे नाव सांगण्यात येते. त्याच्या डोक्यावरून बसचे चाक गेले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हा अपघात होताच एक विद्यार्थी जखमी विद्यार्थ्याकडे धावला व त्याला पकडले. त्याच्या पाठोपाठ इतर विद्यार्थी आणि चालकही धावले. लगेच शाळा प्रशासनाचे लोकही तेथे पोहोचले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. आधी दोन खासगी रुग्णालयांत नेल्यानंतर अखेरीत त्याला मेयो हॉस्पीटलमध्ये (Hospital) (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय) नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

डोळे उघड म्हटल्यावर उघडले होते डोळे..

ज्या विद्यार्थ्याने जखमी विद्यार्थ्याला सर्वप्रथम बघितले आणि उचलले, तो त्याच्याच व्हॅनमधील १०व्या वर्गाचा विद्यार्थी आहे. त्याने सांगितले की सम्यकचा चेहरा रक्ताने माखलेला होता. आम्ही त्याला उचलले, तेव्हा तो हालचाल करीत नव्हता. पण मी ‘आंखे खोल’, असे म्हटल्यावर त्याने डोळे उघडले होते. त्यामुळे त्याला काहीही होणार नाही, याची खात्री होती. पण सायंकाळी त्याच्या मृत्यूची बातमी धडकली. तेव्हा हा विद्यार्थी अतिशय घाबरला होता. आपल्यासोबत व्हॅनमध्ये रोज शाळेत येणारा सम्यक आता आपल्यासोबत नसणार, ही कल्पनाच त्याला सहन झाली नाही.

Nagpur
माणदेश कॉरिडॉर : गोपीचंद पडळकरांची तोफ नागपूर अधिवेशनात धडाडणार

व्हॅनमध्ये होती दोन मुले..

महिला आणि एका पुरूषाला धडक दिल्यानंतर स्कूल बस ज्या व्हॅनला घासत पुढे घेऊन गेली. (सीसीटीव्ही फुटेज मध्ये तसे स्पष्ट दिसते) त्या व्हॅनमध्ये दोन मुले होती. व्हॅनचालकाने लगेच सावध होत. चालकाच्या विरूद्ध बाजुने जाऊन व्हॅनचे स्टेअरींग डाव्या बाजुला फिरवले आणि बसच्या तावडीतून व्हॅन बाजुला काढली. त्यानंतर बस पुढे जाऊन विजेच्या खांबाला जाऊन धडकली आणि थांबली. तेव्हा कुठे मृत्यूचा थरार थांबला, असे चालकाने सांगितले.

एसटीचा निवृत्त व्यक्ती होता स्कूल बसचा चालक..

ज्या स्कूल बसने विद्यार्थ्याला चिरडले, त्या बसचा चालक एस.टी. महामंडळाचा निवृत्त चालक असल्याची माहिती आहे. त्याचे वय ७० च्या जवळपास असल्याचे सांगण्यात आले. सुरूवातीला महिला व पुरूषाला धडत दिल्यानंतर तो घाबरला असावा आणि नंतर त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्हॅनच्या चालकाने व्यक्त केला. पोलिस चौकशीत काय ते समोर येईलच. पण काहीही चूक नसताना सम्यकचा जीव गेला आणि त्याच्या मित्रांना दुःखात बुडवून गेला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com