Transfer : पाच बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी?

IAS : दिपा मुधोळ मुंडे आयएएस (२०११) याआधी औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासक होत्या.
IAS transfers
IAS transfersSarkarnama

Transfer of IAS Officers : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ३० वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा पाच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजेंद्र भोसले, निधी चौधरी, दिपा मुधोळ-मुंडे यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राजेंद्र भोसले, आयएएस (२००८), या आधी अहमदनगरचे जिल्हाधिकारी होते. आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. दिपा मुधोळ मुंडे आयएएस (२०११) याआधी औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासक होत्या. आता बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. राधा विनोद शर्मा आयएएस (२०११) याआधी बीडच्या जिल्हाधिकारी होत्या. आता औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे.

सिद्धार्थ सालीमथ आयएएस (२०११) यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. निधी चौधरी आयएएस (२०१२) याआधी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी होत्या. आता त्यांची मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे. या बदल्या मागील काही काळापासून थांबलेल्या होत्या. यामध्ये कुणाची काय ‘रूची’ आहे, याचीही जोरदार चर्चा सुरू होती. आता बदल्या झाल्यानंतर राजकारण तापू नये, अशी अपेक्षा केली जात आहे.

बीडमध्ये नव्या जिल्हाधिकारी ‘मुंडे’

बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांची अखेर बदली करण्यात आली आहे. बीडला जिल्हाधिकारी म्हणून दिपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. आता अखेर त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर दिपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिपा मुधोळ मुंडे या २०११च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे.

IAS transfers
IAS IPS Transfer : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत शिंदे-फडणवीसाचं अखेर ठरलं..

डिसेंबर महिन्यात ३६ अधिकाऱ्यांच्या बदल्या..

राज्य सरकारने (State Government) डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ३० वरिष्ठ पोलीस (Police) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. तर काही अधिकाऱ्यांची (Officers) पदोन्नती करण्यात आली होती. यामध्ये पुण्याचे (Pune) पोलीस आयुक्त (Police Commissioner) अमिताभ गुप्ता, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचाही समावेश होता. तर डिसेंबरअखेर सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात राजेश पाटील आणि अजय गुल्हाने यांच्यासह इतर चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com