Issue of Unemployment : सरकारी कंपन्यांचे खासगीकरण, कंत्राटी नोकर भरती असे धोरण केंद्र आणि राज्य सरकारकडून राबिवलं जातंय. काँग्रेसनं या सरकारी धोरणांचा अकोला येथे अनोख्या पद्धतीनं निषेध केला. माजी उपमहापौर तथा काँग्रेस नेते निखिलेश दिवेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भजे तळत व चहा त्यांची विक्री केली. या आंदोलनातून बेरोजगारांच्या समस्यांकडं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
देशात १८ ते ३० वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. सुमारे ३० कोटींवर तरुणाई देशात आहे. यात दरवर्षी वाढ होतेय. युवकांच्या हाताला काम नसल्यानं देशातील गरिबी सातत्यानं वाढतेय. अशात सरकार रेल्वे, एअर इंडिया, सरकारी बँक आदींचे खासगीकरण करतेय. अग्निवीर योजनेतून फक्त चार वर्षांसाठी रोजगार मिळतो. मात्र, त्यानंतर युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते, असा आरोप काँग्रेसकडून होतोय. (Unique movement of Akola Congress to draw attention to the problem of unemployment Nikhilesh Divekar leads the protest)
केंद्र सरकारच्या जोडीला राज्यातही कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती करण्यात येतेय. सरकारच्या या धोरणांमुळं केवळ अदानी, अंबानीसारख्या मोदींच्या मित्रांना फायदा होत असल्याचा आरोपही काँग्रेसकडून या वेळी करण्यात आलाय. बेरोजगारी वाढत असल्यानं व तरुणांच्या हाताला काम नसल्यानं ते चहा, नाश्ता बनविणे, पानपट्टी चालविणे, पंक्चर काढण्याची कामं करताहेत. याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं.
आंदोलनाचा प्रारंभ जुने शहर, जय हिंद चौक परिसरातील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळेजवळ करण्यात आला. या आंदोलनात उपस्थित बेरोजगार युवकांनी गांधीटोपी परिधान करीत भजे तळले व चहा विक्री केली. लोकांचं लक्ष वेधत युवकांनी सरकारी धोरणांचा निषेध केला. आंदोलन सुरू असताना रस्त्यांच्या दुतर्फा चांगलीच गर्दी झाली होती. सरकारी धोरणांमुळं बेरोजगारीत कशी वाढ झालीय, यासंदर्भातील पत्रकांचं वितरणही काँग्रेसनं केलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आंदोलनात काँगेस नेते विवेक पारसकर, अफरोज लोधी, माजी नगरसेवक नौशाद खान, रहमान बाबू, आझाद खान, आकाश तंबोली, भूषण टाले, रितेश झांबरे, अन्नपूर्णेश पाटील, गीतेश वानखडे, विकास दिवेकर, नीलेश तोरणे, जनार्धन बुटे, सरदार खान, मुजाहिद खान, सय्यद वसीम, बादशहा खान, सोहेल खान, झाकीर सय्यद, फुहाद खान, इर्शाद खान आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळं विविध राजकीय पक्ष आता शहरात आंदोलनात्मक भूमिकेत आल्याचं दिसत आहे.
Edited By : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.