Ajit Pawar : तुम्ही भाषण देत होते, तेव्हा काही फूट अंतरावर शेतकऱ्याने पेटवून घेतले !

जबाबदारी सांभाळताना श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. तुमच्याकडूनही तेच अपेक्षित आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले.
Ajit Pawar and Eknath Shinde
Ajit Pawar and Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

नागपूर : मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा प्रमुख, ही मोठी जबाबदारी आहे. जबाबदारी सांभाळताना श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. तुमच्याकडूनही तेच अपेक्षित आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून म्हणाले.

दरम्यान विधानभवनासमोर सांगलीतील अंदाजे ४५ वर्षे वयाच्या सुभाष भानुदास देशमुख या शेतकऱ्याने (Farmer) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यावरून अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला खडे बोल सुनावले. तुम्ही येथे भाषण करीत आहात, शेतकऱ्यांसाठी विविध योजना घोषित करता आहात आणि तुमच्या काही फूट अंतरावर एका शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेतले आहे. हे सांगताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले, त्याची माहिती आत्ताच मिळाली आहे. त्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) बोलले. यानंतर सभागृहात गदारोळ उडाला.

विरोधी पक्षनेते सभागृहात बोलत असताना आपण मध्येच बोलून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडत आहात का, असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते बोलत असताना मध्ये बोलू नये, असेही जयंत पाटील यांनी सुनावले. सत्तारूढ पक्षाची बाजू मांडल्यासारखे तुम्ही बोलू नका, असे पाटील अध्यक्षांना म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मध्ये पडले आणि म्हणाले, अध्यक्षांना बोलण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीने त्यांचा अवमान करू नये.

Ajit Pawar and Eknath Shinde
Ajit Pawar : अजित दादा म्हणाले, मुंबई-पुणे हायवे ८ लेन करा...

यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष म्हणाले, विधानभवनाच्या परिसरात एखादी घटना घडते आणि त्याची माहिती विधानसभेच्या अध्यक्षांकडे येते. ती माहिती मी सभागृहात दिली तर कुठल्याही पक्षाची बाजू मांडली असे होत नाही. माझा मान, सन्मान ठेवायचा की ना हा सर्वस्वी तुमचा प्रश्‍न आहे. पण किमान अध्यक्षांच्या खुर्चीचा तरी मान राखला पाहिजे, अशी माझी विनंती आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com