Supriya Sule : ज्यांनी ‘ते’ ट्विट केलं, त्यांनाच तुम्हाला विचारावं लागेल !

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, सगळेच लोक सगळ्यांबद्दल ट्विट करीत असतात. मी देखील रोज काही ना काही ट्विट करते. पण माझा रोख कुणावर नसतो.
MP Supriya Sule
MP Supriya SuleSarkarnama

नागपूर : सिंचन घोटाळ्याचा विषय संपलेला आहे. त्याच्या चौकशीची मागणीही संपलेली आहे. आता ते पुन्हा तो विषय कशाला काढत आहेत, याचे उत्तर मी नाही देऊ शकत. ज्यांनी ट्विट केलं आहे, त्यांनाच तुम्हाला विचारावं लागेल, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यासंदर्भात एका वृत्तवाहीनीशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, सगळेच लोक सगळ्यांबद्दल ट्विट करीत असतात. मी देखील रोज काही ना काही ट्विट करते. पण माझा रोख कुणावर नसतो. आता असेंब्ली सुरू आहे आणि असेंब्ली, पार्लामेंट ही अतिशय महत्वाची ठिकाणं आहेत. तेथून सर्व कामकाज चालतं, सोशल मिडियावरून थोडीच काही देश चालतो. देशाच्या पंतप्रधानांना (Prime Minister) जेव्हा आम्हाला काही सांगायचं असतं, तेव्हा पार्लामेंटमध्ये आम्ही भाषण करतो. प्रत्येक पक्षाची लोक तेथे आहेत. त्यांच्या मताला, बोलण्याला काही तरी महत्व आहेच ना…? केवळ ट्विटरवर थोडीच देश चालणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) वगळता, इतर देशांना जास्त निधी मिळत होता. आताही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भाजपच्या मंत्र्यांना जास्त निधी मिळतोय आणि शिंदे गटाच्या लोकांना कमी निधी मिळतोय, यावर खासदार सुळे म्हणाल्या, मला याबद्दल काही आश्‍चर्य वाटत नाही. हे होणारंच होतं. यात काही नवीन नाही. ‘ये तो होना ही था...’ बी प्लॅन म्हणून भाजप अजित दादांना जवळ करू शकते का, असा प्रश्‍न केला असता त्या म्हणाल्या, पाऊस आला, पूर आला तर सुप्रिया सुळे काय करणार, असा हा प्रश्‍न आहे. यापेक्षाही अन्नधान्य आणि खाण्याच्या वस्तूंवर जीएसटी लागला आहे, हे महत्वाचे प्रश्‍न आहेत.

MP Supriya Sule
चंद्रपूरमध्ये जाऊन अम्माच्या प्रेमात पडल्या खासदार सुप्रिया सुळे !

महाराष्ट्रात पूरस्थिती आहे, महागाई आहे, बेरोजगारी वाढतच चालली आहे, या प्रश्‍नांवर काम करणे महत्वाचे आहे. त्यावर आम्ही काम करतोय. आमचे निवडून आलेले सर्व लोक फक्त राजकारण करण्यासाठी नाही, आरोप प्रत्यारोप करण्यासाठी नाही, तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे संघटनेत काम करतो आणि हेच काम महत्वाचे आहे. आजही मुळशीमध्ये आम्ही या सर्व गोष्टींचाच आढावा घेतला. जीएसटी वाढवल्यामुळे दूध, दही महागले आहे. माझ्यासोबत माझे जे सहकारी आहेत, ते सकाळी बायकांची बोलणी खाऊन आले आहेत. मलाही अनेकांनी हे प्रश्‍न विचारले आहेत. हे प्रश्‍न सोडविणे ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे समाजकारण आधी नंतर राजकारण, असे खासदार सुळे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com