नवाब मलिकांना दणका : वानखेडे प्रकरणात कोर्टात हजर राहण्याचे आदेश

वाशिम न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश (Washim court ordered to nawab malik)
Sameer Wankhede and Nawab Malik
Sameer Wankhede and Nawab Maliksarkarnama

वाशिम : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना कोर्टाने दणका दिला आहे. १३ डिसेंबर रोजी त्यांना या प्रकरणात वाशिम सत्र न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागच्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशाने नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी नवाब मलिक यांच्यावरील हल्लाबोल थांबवला आहे. मात्र त्यापुर्वी त्यांनी अनेक पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडे यांच्यावर बनावट जातीचे प्रमाणपत्र बाळगल्याचे आरोप केले होते. तेच आरोप आता मलिक यांना भोवण्याची शक्यता आहे.

समीर वानखडे यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र नोकरी मिळविली, त्यांची नोकरी जाणार असे नवाब मलिक यांनी केले होते. मात्र त्यांच्या नातेवाईकांसह समीर वानखेडे यांच्या जवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याचा दावा वानखेडे कुटुंबियांनी केला होता. याच दाव्यानुसार वानखेडे यांचे चुलतभाऊ संजय वानखेडे यांनी वाशिम शहर पोलिस ठाण्यात 'ॲट्रॉसिटी ऍक्ट'नुसार तक्रार केली होती. त्यानुसार आज वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना १३ डिसेंबर रोजी वाशिम कोर्टात आपले म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Sameer Wankhede and Nawab Malik
मेस्माची टांगती तलवार, डोळ्यात अश्रू : पण कर्मचारी संपावर ठाम

नवाब मलिक यांच्या दाव्यानुसार ज्ञानदेव वानखेडे यांचे नाव दाऊद आहे आणि समीर यांनी मुस्लिम असूनही राखीव गटातून केंद्र सरकारची नोकरी मिळवली, मात्र हा आरोप आधारहिन आहे. मलिक निराधार आरोप करून आमची प्रतिमा मलीन करीत आहेत, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे. मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com