एकनाथ खडसेंनी आयडिया दिली आणि सदाभाऊंचे टेन्शन हलकं झालं...

Sadabhau Khot | Eknath Khadse : निरोपाच्या भाषणात सदाभाऊंची तुफान फटकेबाजी
Sadabhau Khot | Eknath Khadse
Sadabhau Khot | Eknath KhadseSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपल्याला दिलेल्या एका आयडियेमुळे कसे आपले मंत्रिपदाचे दिवस विरोधकांच्या आव्हानांशिवाय गेले याचा किस्सा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (SadaBhau Khot) यांनी सांगितला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. ७ जुलै २०२२ रोजी कार्यकाळ संपून निवृत्त होत असलेल्या १० विधान परिषद सदस्यांचा सभागृहात आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निरोप समारंभ पार पडला. यात सदाभाऊ खोत यांचाही समावेश आहे. यावेळी निरोपाच्या भाषणात ते बोलत होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, मी चळवळीमध्ये काम करत असताना आमदार झालो. लगेच मंत्री झालो. मंत्री झालो की लगेच अधिवेशन पण आले. त्यावेळी बरंच टेन्शन असायचं. कारण प्रश्न एक असायचा तरी त्याचा अभ्यास आणि उत्तराची तयारी मी रात्रभर करायचो. झोपलो तरी तो प्रश्नच पुढे दिसायचा. सभागृहात कागदाचे गठ्ठे घेवून यायचो. पण एक झालेलं असायचं की प्रश्न एक असला त्यावरच्या उत्तराची तयारी असली तरी समोरुन उपप्रश्न वेगळेच यायचे. पुन्हा ते खाली कागद बघायला गेलो तर कागदांचा मेळचं लागायचा नाही. सगळे विरोधक तुटून पडायचे.

गडकरींच्या लोकप्रिय घोषणांचा बुडबुडा फुटला; रस्ते मंत्रालयाने दिले मोठे स्पष्टीकरण

या सगळ्यावर मला एकनाथ खडसे यांनी चांगली आयडिया दिली. ते म्हणाले, चौकशी केली जाईल, कारवाई केली जाईल, पटलावर ठेवलं जाईल ही वाक्य लक्षात ठेवायची. अडचणीत आलं की तुमचं बरोबर आहे, निश्चीतपणे कारवाई केली जाईल, असं म्हणायचं आणि मोकळं व्हायचं, असं सांगतिले. तेव्हापासून माझं काम हलकं झालं. परत विरोधी पक्षात आलो, तेव्हा वाटलं आपल्याला फक्त प्रश्न विचारायचे आहेत, पण कळलं इकडे पण अभ्यास करायला लागतोच. साधं सोप काही नाहीच काही, असेही सदाभाऊ म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com