फडणविसांनी दिल्लीला जावे म्हणजे सुधीर मुनगंटिवार खूष होतील...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत टोलेबाजी
devendra fadnavis-uddhav thackeray
devendra fadnavis-uddhav thackeray

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावे, अशी आग्रही सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आणि एकच हशा पिकला. मागील काळात अनेकजण सरकार पाडण्यासाठी कुंडल्या काढत होते आता ते सरकारच्या कामगिरीचे पुस्तक वाचू लागले आहेत, असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज जोरदार भाषण सरकारला अनेक प्रश्न विचारले. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे कसे उपयोगी आहेत, हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्याला उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात फडणवीस यांनी चांगली मांडणी केली. त्यांनी ते दिल्लीत या कायद्याच्या विरोधात आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना समजून सांगावे, असे म्हणत तसे त्यांना दिल्लीला जायचे वेध आहेतच, असा टोमणा मारला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्लू आईड बाॅय आहेत, असे सांगत त्यांनी मोदींना सांगून महाराष्ट्रासाठी कोरोना काळात जास्त मदत मिळवून आणायला हवी होती. मात्र तसे झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांनी लवकरात लवकर दिल्लीला जायला हवे. कारण ते देशाचा विचार करतात. ते दिल्लीला गेल्यानंतर सुधीर मुनगंटिवार खूष होतील, अशीही कडी ठाकरेंनी केली. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आमच्या मित्राला अडचणीत का आणता, असा मिस्किल सवाल विचारला. 

या वेळी पुरवणी मागण्यांना उत्तर देताना ठाकरे म्हणाले की कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. मी मुख्यमंत्री म्हणून हे जबाबदारीने बोलत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.  मराठा आरक्षणाच्या प्रश्नाविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की ही लढाई लढत असताना इतर समाजांचे आरक्षण कमी करणार का, अशी चर्चा सुरू झाली. मराठा समाजाला आरक्षण देत असताना कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. 

गडकिल्ले आणि प्राचीन मंदिरे यांच्यासाठी विशेष निधी राखून ठेवणार आहे. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिर यांचा विकास केला जाईल. यातून कळेल की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केेले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com