पुणे म्हाडाच्या मुख्य अधिकारी पदासाठी काकडे यांना "पायघड्या" ? 

mhada
mhada

मुंबई: पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी म्हणून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले ए. डब्ल्यू. काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

म्हाडाचे मुख्यअधिकारी म्हणून विविध नियम धाब्यावर बसवून नियुक्ती करताना सरकारने त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे मंत्रालयात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

म्हडाच्या विविध पदावर काम सुरू असताना काकडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. या आरोपांची विभागीय चौकशी सुरू असतानाच काकडे यांना पदाची बढती देण्यात आली आहे. विभागीय चौकशीचा अहवाल काकडे यांच्या बाजूने यावा यासाठी महसूल विभागाच्या सचिवांवर सरकारमधील दिग्गज दबाव टाकत असल्याची माहितीही सुत्रांनी दिली.

नियमानुसार विभागीय चौकशी सुरू असताना आयएएससाठी नामनिर्देशन होत नाही. तरिही काकडे यांना अधिक प्राधान्याने बढती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चारित्र प्रमाणपत्र ( इंटिग्रेटी ) जानेवारी महिन्यात सादर करायचे असा नियम आहे. मात्र, असे असताना काकडे यांनी हे प्रमाणपत्र मे मध्ये सादर केले असून बढती देताना नियमाबाह्यपद्धतीने ते ग्राह्यही धरण्यात आले आहे.

याउपरही पहिल्यांदा आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीचे व महत्वाची पद दिले जात नसल्याचे संकेत आहेत. असे असतानाही काकडे यांची पहिले नियुक्ती म्हाडा सिएओ सारख्या " मलाईदार" पदावर करण्यात आली. काकडे यांच्यावर कुणामुळे ही "कृपादृष्टी" झाली, आणि पारदर्शी कारभाराचा ढोल बडवणाऱ्या सरकारमध्ये कुणाला काकडे यांनी " खुश" केले आहे ? याची जोरदार चर्चा मंत्रालय परिसरात रंगली आहे. 


दरम्यान, आएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या हा विषय सामान्य प्रशासनाच्या अखत्यारित आहे. सामान्य प्रशासन हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे काकडे यांच्यावर ही "कृपादृष्टी" त्यांनी केली की, कोणाच्या सांगण्यावरून झाली हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com